AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai News : धक्कादायक, विक्रोळीत पहाटेच्या सुमारास गाणी लावण्याच्या वादातून एकाच कुटुंबातील दोघांची हत्या

Mumbai News : मुंबईत गुन्ह्याच्या दोन घटना घडल्या आहेत. एका घटनेत कौटुंबिक वादातून चाकू हल्ल्यात वडिल आणि मुलाचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या घटनेत कुर्ल्यामध्ये एका तरुणाला संपवण्यात आलं आहे.

Mumbai News : धक्कादायक, विक्रोळीत पहाटेच्या सुमारास गाणी लावण्याच्या वादातून एकाच कुटुंबातील दोघांची हत्या
crime news
| Updated on: Aug 06, 2026 | 8:07 AM
Share

विक्रोळीत आज पहाटे 2 वाजता कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड घडलं. वडील आणि 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. विक्रोळी (पश्चिम) येथील राहुल नगरमध्ये 6 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजात संगीत लावण्याच्या कारणावरून झालेल्या कौटुंबिक वादातून चाकू हल्ला झाला. या हल्ल्यात सुनील विश्वकर्मा (40) आणि त्यांचा 14 वर्षीय मुलगा श्लोक विश्वकर्मा यांचा राजावाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अंजू विश्वकर्मा आणि विवान विश्वकर्मा हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा या दोघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

विश्वकर्मा कुटुंब राहुल नगर येथे वास्तव्याला आहे. चार सख्खे भाऊ एकाच घरात राहतात. सुनील विश्वकर्माने घरात पहाटेच्या मोठ्या आवाजात गाणी लावली होती. यावरुन दोन भाऊ सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील यांना जाब विचारला. यावरुन सुनील विश्वकर्मा आणि दोन भावांची शा‍ब्दिक बाचाबाची झाली. ही बाचाबाची इतकी टोकाला गेली की या सगळ्यांची हाणामारी सुरु झाली. त्यावेळी सुरेंद्र विश्वकर्मा आणि सूरज विश्वकर्मा यांनी सुनील विश्वकर्मा आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केले.

फरहान खान असे मृत तरुणाचे नाव

दुसरी घटना कुर्ला (पूर्व) येथील कुरेशीनगर हिल परिसरात घडली. घराच्या भिंतीवर लघुशंका केल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादातून तरुणाची हत्या करण्यात आली. फरहान खान असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी साजीद अली (२४) याला अटक केली आहे. ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० ते ६.३५ वाजण्याच्या दरम्यान सय्यद बाबा चाळ, कुरेशीनगर हिल,कुर्ला येथे ही घटना घडली. शहजाद खान यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घराच्या भिंतीवर लघुशंका केल्याच्या कारणावरून यापूर्वी साजीद आणि त्याच्यामध्ये वाद झाला होता

शिवीगाळ करुन धमकी दिली

त्यावेळी साजिद याने शहजाद याला शिवीगाळ केली धमकी दिली. या घटनेनंतर शहजाद याचा भाऊ फरहान हा साजिद याला जाब विचारण्यासाठी गेला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. साजीदने फरहानच्या छातीवर बुक्का मारून जोराचा धक्का दिला. यामुळे फरहान सिमेंटच्या पायरीवर तोंडावर पडला. यात त्याचा मृत्यू झाला

Follow Us