AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलची झोप उडाली, इराणचा सर्वात डेंजर नेता आता…लारिजानी यांच्या हत्येनंतर मोठ्या घडामोडी!

इस्रायलने केलेल्या हल्ल्यात इराणचे महत्त्वाचे नेते अली लारिजानी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता त्यांची जागा कोण घेणार, असे विचारले जात आहे. कोणतीही तडजोड न करणारा नेता लारिजानी यांची जागा घेऊ शकतो.

इस्रायलची झोप उडाली, इराणचा सर्वात डेंजर नेता आता...लारिजानी यांच्या हत्येनंतर मोठ्या घडामोडी!
saeed jaliliImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 18, 2026 | 3:07 PM
Share

Iran Israel War : अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात टेन्शन वाढलं आहे. भारतात तर उर्जासंकट दिवसेंदिवस भीषण होत चाललं आहे. गॅस सिलिंडरचा भाव वाढला असून तो वेळेवर मिळत नाहीये. दुसरीकडे इराणनेही काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, असं ठरवून टाकलं आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणला नेस्तनाबूत करण्याचा प्रण केले आहे. याच मोहिमेचा एक भाग म्हणून इराणचे वरिष्ठ संरक्षण अधिकारी अली लारीजानी यांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यात ते ठार झाले आहेत. लारीजानी हाे संरक्षण आणि सैन्याची नीती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत होते. परंतु त्यांचा मृत्यू झाल्यानंतर आता इराणच्या नेतृत्त्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून महत्त्वाचे निर्णय घेताना आता काय होणार? असे विचारले जात आहे. असे असतानाच आता इराणमध्ये एक मोठा चेहरा समोर आला आहे. या व्यक्तीला इराणने महत्त्वाचे अधिकार घेण्याची जबाबदारी दिली तर अमेरिका, इस्रायलची डोकेदुखी वाढू शकते, असे बोलले जात आहे.

लारिजानी गेल्यामुळे इराणला मोठा धक्का

अली लारिजानी हे सैन्य आणि संरक्षण नीती विभागाचे प्रमुख होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान ते रणनीती ठरवणे, आण्विक चर्चा, अंतर्गत विरोध, संरक्षणविषयक बाबी अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महत्त्वाची भूमिका पार पाडायचे. इराण संकटात सापडलेला असताना त्यांच्या निर्णयाला फार महत्त्व होते. परंतु लारिजानी यांचा इस्रायली हल्ल्यात मृत्यू जाला. त्यामुळे इराणला मोठा धक्का बसला आहे. लारिजानी यांची जागा कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लारिजानी यांच्याएवढाच प्रभावी, निर्णयक्षम चेहरा असायला हवा, असे मतप्रवाह इराणमध्ये आहे. त्यामुळे आता लारिजानी यांच्यावर असलेली जबाबदारी इराणमधीलच एका महत्त्वाच्या व्यक्तीकडे सोपवावी असा सूर आळवला जात आहे.

लारिजानी यांची जागा कोण घेणार?

लारिजानी यांची जागा आता सईद जलिली हे घेतील असे बोलले जात आहे. सईद जलिली हे इराणच्या प्रशासनातील महत्त्वाचे नाव आहे. ते एक इराणमधील प्रमुख नेते आहेत. ते धोरणात्मक निर्णयांत महत्त्वाची भूमिका बजावतात. 2007 ते 2013 या काळात राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांच्या कार्यकाळात त्यांनी पश्चिमी देशांसोबत चर्चा करण्याच्या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावलेली आहे. ते कोणतीही तडजोड न करण्याची मानसिकता असलेले नेते मानले जातात. इराण अडचणीत सापडलेला असताना लारिजानी यांच्यावर असलेली जबाबदारी त्यांच्यावर टाकावी, अशी मागणी केली जात आहे. तेच लारिजानी यांची जागा घेतील, असे बोलले जात आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल