AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प अडकले, डोक्यात मारून घेण्याची वेळ, मोठा विश्वासघात, पळून पळून..

इराण आणि अमेरिका युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. मात्र, यादरम्यान कधीही न भरून निघणारे नुकसान झाले. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धात काही देशांकडे मदत मागितली. मात्र, एकही देश डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला पुढे न आल्याने त्यांना मोठा धक्का बसला.

डोनाल्ड ट्रम्प अडकले, डोक्यात मारून घेण्याची वेळ, मोठा विश्वासघात, पळून पळून..
Donald Trump
| Updated on: Mar 18, 2026 | 10:29 AM
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणसोबत युद्धाच्या मैदानात फसल्याचे बघायला मिळत आहे. युक्रेन आणि रशियाच्या युद्धात त्यांनी थेट रशियाच्या विरोधात युक्रेनला पाठिंबा दिला आणि प्रत्येक मदत दिली. मात्र, इराणसोबतच्या युद्धात अमेरिका थेटपणे मैदानात उतरली असता एकही देश त्यांच्या मदतीकरिता पुढे येताना दिसत नाही. स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांनी मदत मागूनही एकही देश मदतीचा हात पुढे घेऊन आला नाही. इराणसोबतच्या युद्धात कुठेतरी अमेरिका मागे पडताना दिसत आहे. गंभीर संकटात अमेरिका अडकली. 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्तपणे इराणवर हल्ला केला. या हल्ल्यानंतर इराणने अनेक देशांना सळो की पळो करून सोडले. थेट आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळावर हल्ला करत तेथील रडार सिस्टम इराणकडून उडवून टाकण्यात आली. आखाती देश देखील अमेरिकेपासून दुरावले आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे संचालक जो केंट यांनी राजीनामा दिला. इराणसोबतच्या युद्धात डोनाल्ड ट्रम्प चारही बाजूंनी घेरल्याचे बघायला मिळत आहे. डेमोक्रॅट्सनी वॉर पॉवर्स रिझोल्यूशन सादर केले, ज्यात ट्रम्प यांनी इराणमधील पुढील कारवाईसाठी काँग्रेसची मंजुरी घ्यावी अशी मागणी केली आहे. हा ठराव सिनेटमध्ये 53-47 आणि हाऊसमध्ये 219-212 मतांनी फेटाळले गेले. मात्र, हे मतदान पक्षीय धर्तीवर विभागले गेले होते.

बहुतेक डेमोक्रॅट्सनी याला काँग्रेसला डावलून लढलेले एक बेकायदेशीर युद्ध म्हटले. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धात आंतरराष्ट्रीय स्तरावरही डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसत आहे. नाटो देशांनीही डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून स्वत: ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: याबद्दल विधान करत म्हटले की, बहुतेक नाटो सदस्यांना इराण युद्धात होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये मदत करायची नाही.

थोडक्यात काय तर आजच्या घडीला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत कोणीही उभे दिसत नाहीये. त्यांचे जवळचे सहकारी त्यांची साथ सोडत आहेत तर देशातूनही विरोध होत आहे. शिवाय कोणतेही देश त्यांच्या मदतीला येत नाहीत. डोनाल्ड ट्रम्प इराणसोबतच्या युद्धात एकटे पडले आहेत. होर्मुज खाडीवर अजूनही इराणचे पूर्णपणे नियंत्रण आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर नाराज आहेत. नाटोकडून थेट विश्वासघात करण्यात आल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का बसला.

Follow Us
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...