AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काजू बदाम किंवा मनुका प्रत्येक सुकामेवा शरीराला देतात वेगवेगळी शक्ती जाणून घ्या प्रत्येकाच्या फायद्यांविषयी

तुम्ही सुद्धा स्वतःला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी सुका मेवा खात असाल, तर सुक्यामेव्यातील प्रत्येकाचे खाण्याचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात.

काजू बदाम किंवा मनुका प्रत्येक सुकामेवा शरीराला देतात वेगवेगळी शक्ती जाणून घ्या प्रत्येकाच्या फायद्यांविषयी
dried fruit
| Edited By: | Updated on: Mar 18, 2026 | 1:46 PM
Share

आजच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरस्त राहण्यासाठी नियमित योग्य प्रमाणात सुक्यामेव्याचे सेवन करावे. कारण सुकामेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे, आरोग्यदायी फॅट, प्रथिने आणि अँटीऑक्सिडंट्स अनेक आवश्यक पोषक तत्वे असतात. जे शरीराच्या विविध अवयवांना मजबूत करतात. काही सुकामेवा हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला असतो, काही बुद्धी तल्लख करतात, तर काही हाडे आणि पचनसंस्था मजबूत करतात. म्हणूनच डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ सुकामेवा मर्यादित प्रमाणात खाण्याची शिफारस करतात. चला तर मग आजच्या लेखात आपण सुकामेव्यातील प्रत्येकांचे शरीराला कशाप्रकारे फायदे प्रदान करतात ते जाणून घेऊयात.

बदाम

बदामांबद्दल बोलायचे झाल्यास याचे सेवन मेंदूसाठी उत्तम मानले जाते. आयुर्वेदानुसार बदाम बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती वाढवतात. शास्त्रीयदृष्ट्या, बदामांमध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आरोग्यदायी फॅट्स असतात. तर यातील व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडे मजबूत करण्यासही मदत करतात. नियमितपणे भिजवलेले बदाम खाल्ल्याने मेंदूचे कार्य सुधारते आणि ऊर्जा मिळते.

अक्रोड

अक्रोड आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. त्यांची रचना काही प्रमाणात मेंदूशी मिळतीजुळती असल्यामुळे ते मेंदूसाठी फायदेशीर ठरतात. विज्ञानानुसार अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असतात जे हृदय आणि मेंदू या दोन्हींसाठी फायदेशीर आहेत. अक्रोडचे सेवन शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात. आयुर्वेदात अक्रोड शक्ती वाढवणारे आणि मानसिक ताण कमी करणारे मानले जातात. त्यांच्या नियमित सेवनाने मेंदूची कार्यक्षमता सुधारण्यास मदत होऊ शकते.

काजू

काजू चवीला जितके चविष्ट आहेत, तितकेच पौष्टिकही आहेत. त्यामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक आणि प्रथिने यांसारखी पोषक तत्वे असतात. शास्त्रानुसार हे सर्व घटक हाडे आणि दात मजबूत करण्यास मदत करतात. काजू मधील झिंक हे घटक त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदात काजू शरीराला शक्ती देतात आणि अशक्तपणा दूर करतात असे मानले जाते. तथापि त्यांचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे उत्तम आहे.

पिस्ता

पिस्ता हा एक पौष्टिक सुकामेवा आहे. त्यात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन बी6 आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. पिस्ता हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यास मदत करू शकतो. त्यातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट जास्त वेळ भरलेले राहते.

मनुका

मनुका हे एक गोड आणि पौष्टिक फळ आहे. त्यात लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. शास्त्रानुसार, लोह रक्त तयार होण्यास मदत करते, त्यामुळे ॲनिमियाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी मनुका फायदेशीर ठरू शकतात. आयुर्वेदानुसार मनुका पचनक्रिया सुधारण्यास आणि शरीर मजबूत करण्यास मदत करतात. खाण्यापूर्वी त्यांना भिजवल्याने त्यातील पोषक तत्वे प्रभावीपणे शोषली जातील याची खात्री करता येते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?