AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकचं पालकमंत्री छगन भुजबळ यांना करण्याची मागणी; भाजपच्या संकटमोचकांनी मोजक्या शब्दात विषय संपवला, चर्चांना उधाण

girish mahajan : मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदावर मोठं भाष्य केलं आहे. त्यामुळे महाजन यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.

नाशिकचं पालकमंत्री छगन भुजबळ यांना करण्याची मागणी; भाजपच्या संकटमोचकांनी मोजक्या शब्दात विषय संपवला, चर्चांना उधाण
| Updated on: Aug 03, 2026 | 1:35 PM
Share

नाशिकमध्ये मागील काही दिवसांत खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांचे बळी जाऊ लागले आहेत. मागील काही दिवसांत आतापर्यंत 6 जणांचे मृत्यू झाला आहेत. शहरातील खड्ड्यांमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांना करून नाशिकला खड्ड्यातून बाहेर काढा, अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरमुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदाची पुन्हा ऐरणीवर आली आहे. या पालकमंत्रिपदाबाबत मंत्री भाजपचे संकटमोचक मानले जाणारे गिरीश महाजन यांनी महत्त्वाचं भाष्य केलं.

मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधता राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केलं. नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत म्हणाले, ‘भुजबळ साहेब ज्येष्ठ आहेत. वरिष्ठ आहेत. त्यांच्याविषयी लोकांच्या भावना मी समजू शकतो. या संदर्भातले सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना आहेत आणि ते याबाबतीत निर्णय घेतील’. तर रायगड पालकमंत्रिपदाबाबत ते म्हणाले, ‘ज्यावेळी रायगड विधान परिषदेच्या जागेचा निर्णय झाला. त्यावेळी या संदर्भात बोलणं झालेला आहे असं माझ्या कानावर आल आहे. मला वाटतं , रायगडचा तिढा लवकरच सुटेल, असे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्यात अबोला आहे का, यावर ते म्हणाले, आमच्यात कुठेही अबोला नाही. पुतळा अनावरणाच्या वेळेस देखील मी त्यांना हात धरून वरती घेऊन गेलो. त्यानंतर स्टेजवर जेवढं बोलायचं होतं तेवढं बोललो. माझ्यात आणि छगन भुजबळ यांच्यात कुठेही दुरावा नाही. कुठेही मतभेद नाही. माझे आणि छगन भुजबळ यांचे अतिशय चांगले संबंध आहेत’.

संजय राऊत यांनी नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरून चंपत राय म्हणत गिरीश महाजन यांच्यावर टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना महाजन म्हणाले, ‘संजय राऊत यांना सगळी मूभा आहे. त्यांना कोण थांबवू शकतं. मला त्याबद्दल काही बोलायचं नाही आणि मला त्यांच्यासारखं बोलता येत सुद्धा नाही. माझ्यावर बंधने आहेत. संजय राऊत यांच्या जिभेला कुठे हाड आहे, ते पंतप्रधान , अमित शहा , देवेंद्र जी फडणवीस एकनाथ शिंदे तसेच सरन्यायाधीश यांच्यावर बोलतात. त्यांच्या मागे आणि पुढे कोणी नाही. त्यांना मागच्या दाराने टाकलं म्हणून ते मागच्यावेळी खासदार झाले. एखादी निवडणूक लढून बघा. एखाद्या मतदारसंघांमध्ये निवडून बघा. त्यांना लोकांचं काही घेणेदेणे नाही. त्यांना चंपत राय म्हणून द्या किंवा आणखी कुठला रॉय म्हणू द्या’.

देवेंद्र फडणवीस यांच्या काकांच्या वक्तव्यावर महाजन यांनी भाष्य केलं. ‘हे त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. पण देवेंद्रजी यांच्यामध्ये कुठलीच कमी नाही, ते सर्व गुणसंपन्न आहेत. पण त्यांच्या काकांनी म्हटला आहे हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकतं. महाराष्ट्राला देखील एकदा संधी मिळाली पाहिजे. आमचा मराठी माणूस आमच्या महाराष्ट्रातला माणूस पंतप्रधान झाला तर त्यात वाईट काय आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावे अशी मंत्री गिरीश महाजन यांनी अप्रत्यक्षरीत्या इच्छा बोलून दाखवली आहे. परंतु हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचा आहे. वरिष्ठ पातळीवर आमचं हाय कमांड बसलेलं आहे. ते या संदर्भातला निर्णय करतात. या ठिकाणी बसून पंतप्रधानपदाची चर्चा करणं म्हणजे अत्यंत बालिश होईल, असेही त्यांनी सांगितले.

Follow Us
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा,
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा, नाव न घेताच...
CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच
मोठी राजकीय घडामोड! CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच शिक्कामोर्तब?
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण शरण सिंहंची निर्दोष मुक्तता
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...
मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला...
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा...
मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
Pune News | तर एकही वाचला नसता... मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण?
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण? बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत
2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी
Shivsena | 2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी खास रणनीती काय?
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल, थेट संसदेत...
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना...
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना... संजय राऊतांचा मोदींवर थेट प्रहार