AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर

मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर

| Updated on: Aug 03, 2026 | 12:37 PM
Share

राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी "आता निवृत्त व्हावंसं वाटतं" असे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडूनही विविध प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेसने तर पंकजा मुंडे यांना थेट पक्षात येण्याची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे नेतृत्व करण्याची ऑफर दिली आहे.

राज्याच्या मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी “आता निवृत्त व्हावंसं वाटतं” असे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडूनही विविध प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेसने तर पंकजा मुंडे यांना थेट पक्षात येण्याची आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे नेतृत्व करण्याची ऑफर दिली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांना भाजप सोडण्याचे खुले आवाहन केले. “गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ओबीसी नेतृत्वाला डावलण्याचे काम सुरू झाले. पंकजा मुंडे यांना पक्षात न्याय मिळत नसल्याची भावना असेल, म्हणूनच त्यांच्या भावना अशा प्रकारे व्यक्त होत आहेत,” असे वडेट्टीवार म्हणाले.

यावेळी त्यांनी पुढे सांगितले की, “पंकजा मुंडे यांनी भाजपमधून बाहेर पडून स्वतंत्र नेतृत्व करावे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात. काँग्रेस त्यांच्या पाठीशी उभी राहील. त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतल्यास पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे भाजपमधील अंतर्गत नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असून, काँग्रेसच्या या ऑफरमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, काँग्रेसच्या या प्रस्तावावर पंकजा मुंडे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

राजकीय वर्तुळात आता पंकजा मुंडे पुढे कोणती भूमिका घेतात आणि भाजपकडून यावर काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Aug 03, 2026 12:37 PM

Follow Us