Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या कारने विलेपार्ले येथे एका पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात सुनील धुलविया नावाचा पादचारी किरकोळ जखमी झाला आहे. अपघातावेळी सुनील प्रभू गाडीत होते, मात्र ड्रायव्हर गाडी चालवत होता. पोलिसांनी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीने एका पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या अपघातात सुनील धुलविया नावाचे पादचारी किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना मुंबईतील विलेपार्ले येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सुनील प्रभू हे एअरपोर्टवरील एका कार्यक्रम आटपून कांदिवलीच्या दिशेने जात असताना त्यांच्या गाडीने एका सिग्नलवर पादचाऱ्याला धडक दिली. अपघातावेळी सुनील प्रभू गाडीत उपस्थित होते, मात्र त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. जखमी झालेल्या सुनील धुलविया यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलीस त्यांचा रितसर जबाब नोंदवून घेणार आहेत.
विलेपार्ले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी गाडी चालवत असलेल्या ड्रायव्हरवर मोटर व्हेईकल ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
Published on: Sep 18, 2026 03:09 PM
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...

