AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AC मध्ये बसून ज्ञान झाडण्याची गरज…, मोदींचं समर्थन करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीला जेन झींनी शिकवला चांगलाच धडा

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर फक्त दिल्लीत नाही तर, देशभरात जेन झींनी आंदोलन पुकारलं आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागला... आंदोलनात विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द वापरले.. ज्यामुळे अनेकांनी विद्यार्थ्यांचा विरोध केला. अशाच मोदींचं समर्थन करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीला जेन झींनी चांगलाच धडा शिकवला आहे.

AC मध्ये बसून ज्ञान झाडण्याची गरज..., मोदींचं समर्थन करणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीला जेन झींनी शिकवला चांगलाच धडा
Bhumi Pednekar
| Updated on: Aug 03, 2026 | 1:23 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर दिल्ली येथील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं. या आंदोलनादरम्यान जेन झींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपशब्द देखील वापरले. ज्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. मोदी यांच्या विरोधात अपमानजनक भाषेचा वापर केल्याने अभिनेत्री भूमी पेडणेकर हिने सोशल मीडियावर त्यांच्या समर्थनात एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री इन्स्टाग्रावर एक व्हिडीओ पोस्ट करत, तरुणांना एक सल्ला दिला आहे, स्वतःचा संताप व्यक्त असताना, अपमानजनक शब्दांचा वापर करु नका… कारण आपल्या देशाची संस्कृती नाही… अभिनेत्रीच्या या व्हिडीओनंतर अनेकांनी भूमीवर निशाणा साधला आहे… अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला विचारलं, ‘विद्यार्थ्यांवर जेव्हा लाठीचार्ज तेव्हा काही का बोलली नाही…’, असं म्हणत अनेकांनी भूमीवर निशाणा साधला आहे…

भूमी पेडणेकर हिचा व्हिडीओ…

व्हिडीओ पोस्ट करत भूमी म्हणते, ‘सध्या जे व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये अशा भाषेचा उपयोग होत आहे आणि आपल्या देशाते तरुण ज्या प्रकारे बोलत आहे… आपण असं बोलत नही… आपण त्या व्यक्तीबद्दल बोलत आहोत, जी व्यक्ती देशातील सर्वात उच्च पदावर आहे…’, एवढंच नाही तर, भूमीने या विषयाची तुलना कुटुंबातील मोठ्या व्यक्तींशी केल्या जाणाऱ्या संभाषणाशी केली.

सार्वजनिक चर्चेत अपमानास्पद किंवा असभ्य भाषेचा वापर केला जावा का, असा प्रश्न तिने उपस्थित केला आणि ‘संस्कृती’ ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे, यावर भर दिला. तिने विचारलं, “आपण आपल्या घरातील मोठ्यांशी कधी अशा प्रकारे बोलतो का? आपण खरोखरच अशी असभ्य भाषा वापरू शकतो का?”

भूमी पेडणेकर हिच्यावर साधला नेटकऱ्यांनी निशाणा

भूमीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात अनेकांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. मोदींचं समर्थन केलं. पण तेव्हा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आले.. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक तरुण जखमी झाले… यावर संताप व्यक्त करत एक नेटकरी म्हणाला, ‘तुला कोणी शिव्या दिला तर तुला चालेल का? तुझ्यावर कोणा AK47 चालवली तर? ही हिंमतीची गोष्ट आहे की, कोणत्या भाषेत तुम्ही निंदा करत आहेत… पण त्यांनी आपल्यावर केलेल्या हिंसेबद्दल काय…’ असा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला..

अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘AC च्या गाडीत बसून आणि पूर्ण मेकअप करुन ज्ञान पाझरण्याची काहीही गरज नाही… ‘, अन्य एक नेटकरी म्हणाला, “मुलं आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्यापूर्वी सत्तेत असलेल्यांना तुम्ही विचारलं होतं का की. त्यांनी काय केलं? आदर हा कमवावा लागतो, त्याची मागणी करून तो मिळत नाही.” दुसऱ्या एका युजरने टिप्पणी केली, “असं वाटतं की तू आंदोलन संपण्याची वाट पाहत होतीस, जेणेकरून आता तुम्ही त्यांचं शहाणपण आणि पावित्र्य या निकषांवर मूल्यमापन करू शकाल.” सध्या भूमीची पोस्ट चर्चेत आहे.

Follow Us
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा,
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा, नाव न घेताच...
CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच
मोठी राजकीय घडामोड! CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच शिक्कामोर्तब?
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
6 महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केलेले भाजप नेते बृजभूषण शरण सिंहंची निर्दोष मुक्तता
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...
मोठी घडामोड! भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा; काँग्रेसची पंकजा मुंडे यांना थेट ऑफर
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला...
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला 15 हजारांहून अधिक पर्यटक देतात भेट, पहा...
मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
Pune News | तर एकही वाचला नसता... मधमाशांनी हल्ला करताच डेडबॉडी सोडून सर्वच पळाले; व्हिडीओ व्हायरल
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण?
भर पत्रकार परिषदेत खासदारावर हल्ला करण्यामागे मास्टमाईंड कोण? बड्या नेत्याची पोस्ट चर्चेत
2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी
Shivsena | 2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी खास रणनीती काय?
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल
हे काय नवीन? अमित शाहांचा राजीनामा मागण्यासाठी संजय राऊतांची नवी शक्कल, थेट संसदेत...
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना...
जे पंतप्रधान देशाच्या संसेदला सामोरं जायला टरकतात त्यांना... संजय राऊतांचा मोदींवर थेट प्रहार