भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा, नाव न घेताच…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘सेवा समर्पण दशक’ कार्यक्रमात भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पोटे यांनी माजी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या वृक्षारोपणाच्या दाव्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

पोटे म्हणाले, “मी स्वतः 1 हजार वृक्ष लागवड करताना माझ्या नाकात दम आला होता. पण इथे काही लोकांनी भलतेच आकडे फुगवून सांगितले. तोंडात येईल तसं बोलून दाखवलं!”
याशिवाय पक्षातील नवीन प्रवेशांवरही त्यांनी भाष्य केले. पोटे म्हणाले, “माझं रक्तच मुळात भाजपचं आहे. जे नवीन पक्षात येत आहेत आणि फुगड्या खेळत आहेत, त्यांच्या अंगावर आधी शेला टाका. केवळ पेपरला पत्र देऊन बातम्या छापण्याची आमची सवय नाही, आम्ही प्रत्यक्षात काम करणारी माणसे आहोत.”
Published on: Aug 03, 2026 01:09 PM
भाजप विरुद्ध भाजप? भर मंचावरून बड्या नेत्याचा राणा दांपत्यावर निशाणा,
CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...