AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी

NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या…; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी

| Updated on: Nov 03, 2026 | 11:05 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटी बैठकीत पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर ज्येष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील नियुक्त्यांमध्ये वरिष्ठांना विश्वासात न घेतल्याने हा असंतोष समोर आला. पार्थ आणि जय पवारांनी भविष्यात सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे आश्वासन दिले. बैठकीत अर्थखात्याची मागणी आणि विलीनीकरणास विरोध यावरही चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षातील निर्णय घेताना, विशेषतः नियुक्त्या करताना, वरिष्ठ नेत्यांच्या अनुभवाचा सल्ला घेतला जावा अशी भूमिका अनेकांनी मांडली.

नुकतीच झिशान सिद्दीकी यांची राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी निवड करण्यात आली. पार्थ पवारांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. मात्र, या नियुक्तीबाबत आपल्याला माध्यमांतून समजले, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते भुजबळांनी दिल्याने पक्षातील संवादहीनता समोर आली. याच कार्यपद्धतीवरून कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी तीव्र असंतोष व्यक्त केला.

यावेळी पार्थ पवार आणि जय पवारांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि भविष्यात सर्वांसोबत समतोल साधून काम करण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे, सुनील तटकरेंनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्या असल्या तरी, पक्ष संघटना आणि आव्हानांवर प्रदीर्घ चर्चा झाल्याचे सांगितले. बैठकीत अर्थखात्याची मागणी आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणास विरोध या प्रमुख मुद्द्यांवरही चर्चा झाली.

Published on: Nov 03, 2026 11:05 AM

Follow Us