AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत

District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत

| Updated on: Nov 03, 2026 | 10:28 AM
Share

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला आहे. अवघ्या एका मताने त्यांनी माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव केला. पाटील यांना ३९, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली. या विजयानंतर संपूर्ण सांगली जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण आहे, तर सुमनताई पाटील आणि रोहित पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बहुप्रतिक्षित संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. यात माजी खासदार संजयकाका पाटील यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला आहे. अवघ्या एका मताने त्यांनी माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव केला, ज्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत मोठी उलथापालथ झाली आहे.

एकूण २१ जागांपैकी १५ जागा बिनविरोध झाल्या होत्या, त्यामुळे उर्वरित सहा जागांसाठी झालेल्या मतदानात चुरस दिसून आली. यापैकी एका जागेसाठी संजयकाका पाटील आणि सुमनताई पाटील यांच्यात थेट लढत होती. मतमोजणीनंतर संजयकाका पाटील यांना ३९ मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सुमनताई पाटील यांना ३८ मतांवर समाधान मानावे लागले. या एका मताच्या फरकाने पाटील यांनी विजय संपादन करत जिल्हा बँकेवरील आपली पकड कायम ठेवली.

या विजयामुळे संजयकाका पाटील यांच्या समर्थकांमध्ये मोठा उत्साह असून, सांगली जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण आहे. दुसरीकडे, सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांच्यासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

Published on: Nov 03, 2026 10:28 AM

Follow Us