AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?

| Updated on: Nov 03, 2026 | 10:17 AM
Share

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या 10 जागांसाठी आज निकाल जाहीर होणार आहे. विखे-थोरात यांच्या सहकार पॅनलसमोर निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनलचे आव्हान आहे. 21 पैकी 11 जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित 10 जागांसाठी चुरशीची लढत झाली. या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या महत्त्वपूर्ण निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. बँकेच्या एकूण 21 जागांपैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या, तर उर्वरित 10 जागांसाठी काल मतदान पार पडले. आज या 10 जागांची मतमोजणी होत असून, जिल्ह्याचे राजकीय भवितव्य ठरवणारा हा निकाल मानला जात आहे.

या निवडणुकीत विखे-थोरात यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनल आणि निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनलमध्ये प्रमुख लढत होत आहे. दोन्ही पॅनलने विजयासाठी कंबर कसली होती. विशेषतः पारनेर तालुक्यात निलेश लंके आणि विखे समर्थक राहुल शिंदे यांच्यातील थेट लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही केवळ जिल्हा बँकेच्या सत्तेची लढाई नसून, स्थानिक राजकारणातील नेत्यांच्या प्रतिष्ठेची कसोटी आहे.

मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास 14 टेबलवर ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कुणाल जायकर यांनी कॅमेरामन कुमार कणकर यांच्यासोबत टीव्ही9 मराठीसाठी अहिल्यानगरमधून ही माहिती दिली आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार असून, लवकरच निकाल समोर येतील.

Published on: Nov 03, 2026 10:17 AM

Follow Us