AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष

Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष

| Updated on: Nov 03, 2026 | 10:44 AM
Share

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांना ५४ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांना ३४ मते मिळाली. याचबरोबर, तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील यांचा एका मताने पराभव करत विजय मिळवला. दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, आमदार गोपीचंद पडळकर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. जत सोसायटी गटातून निवडणूक लढवलेल्या पडळकर यांना ५४ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे उमेदवार विनोद पवार यांना ३४ मतांवर समाधान मानावे लागले. या विजयानंतर पडळकर समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर जल्लोष करण्यात आला. विजयाचा गुलाल उधळून कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला.

याचबरोबर, तासगावमधील अटीतटीच्या लढतीत माजी खासदार संजय काका पाटील यांनीही विजय मिळवला आहे. त्यांनी अवघ्या एका मताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा व माजी आमदार सुमनताई पाटील यांचा पराभव केला. संजय काका पाटील यांना ३९ मते मिळाली, तर सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली. आर. आर. पाटील यांच्या पत्नी असलेल्या सुमनताई पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. या दोन्ही विजयामुळे सांगली जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Published on: Nov 03, 2026 10:44 AM

Follow Us