मोठी राजकीय घडामोड! CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच शिक्कामोर्तब?
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही भूमिका घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, या मुद्द्यावर भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. या बैठकीत रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सोडवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांकडूनही येत्या तीन ते चार दिवसांत रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भरत गोगावले यांना देण्यात आले आहे.
दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीतील घडामोडींना वेग आला असून, येत्या काही दिवसांत या प्रश्नावर पडदा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निर्णयाकडे आता रायगडसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Published on: Aug 03, 2026 01:06 PM
CM-DCM कडून भरत गोगावले यांना आश्वासन; रायगडच्या पालकमंत्रीपदावर लवकरच
महिला कुस्तीपटू प्रकरणात बृजभूषण सिंह यांना मोठा दिलासा; 6 गंभीर...
भाजप सोडा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हा...
न माथेरान न महाबळेश्वर, महाराष्ट्रातील या पर्यटनस्थळी एका दिवसाला...