Jio ने लाँच केले चार सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, खर्च कमी आणि वैधता जास्त
Jio ने देखील ट्रायच्या सल्ल्याने चार नवीन स्वस्तातले रिचार्ज प्लान उतरवले आहेत. जिओचे हे प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस बेनिफिट्ससह मिळतात.

Airtel आणि Vodafone Idea ने देखील TRAI ने रेकमेंड केलेले चार नवीन स्वस्त रिचार्ज प्लान लाँच केले आहेत. जिओने TRAI द्वारा गेल्या महिन्यात सुचवलेले टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन एक्टच्या 13 व्या दुरुस्तीनुसार हे चार स्वस्त रिचार्ज प्लान उतरवले आहेत. ज्यात एका महिन्याची वैधता मिळते. दूरसंचार नियामकने टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिले होते की ‘फिचर फोन युजर्स’ साठी केवळ व्हॉईसवाले स्वस्तातले प्लान उतरवावे, ज्यामुळे त्यांच्या खिशावर भार पडणार नाही.
Jio चे हे चार प्लान 147 रुपये, 177 रुपये, 196 रुपये आणि 197 रुपये किंमतीत लाँच केले आहेत. जिओने हे प्रीपेड प्लान व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलच्या तुलनेत कमी किंमतीत सादर केले आहेत. एअरटेलचा TRAI वाला सर्वात स्वस्त प्लान 185 रुपयात येतो. तसेच व्होडाफोनचा ट्रायवाला सर्वात स्वस्त प्लान 179 रुपयात येतो. व्होडाफोन-आयडियाचा सर्वात स्वस्त प्लान 25 दिवसांच्या वैधतेचा मिळतो.
147 रुपयांचा प्लान
जिओचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान 22 दिवसांच्या वैधतेचा आहे. यात प्रीपेड प्लानमध्ये मिळणारे फायद्याचा विचार केला तर संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि फ्री नॅशलन रोमिंगचा लाभ मिळेल. तसेच युजर्सना 300 फ्री एसएमएसचा लाभ मिळतो.
177 रुपयांचा प्लान
जिओचा हा सर्वात 177 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लान 28 दिवसांच्या वैधतेचा आहे. या प्रीपेड प्लानमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सचा विचार केला तर यात संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचा लाभ मिळतो.तसेच युजर्सना 300 फ्री SMS चा लाभ देखील मिळतो.
196 रुपयांचा प्लान
जिओचा हा 196 रुपयांचा प्लान सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान 30 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्रीपेड प्लानमध्ये मिळणाऱ्या फायद्याचा विचार करता यात संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचा लाभ मिळतो. तसेच युजर्सना 300 फ्री SMS चा लाभ देखील मिळतो.
197 रुपयांचा प्लान
जिओचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान कॅलेंडर मंथच्या वैधतेसह येतो. कॅलेंडर मंथ म्हणजे ज्या तारखेला रिचार्ज केला त्याच तारखेपर्यंत महिनाभर वैधता मिळेल. या प्रीपेड प्लानमध्ये मिळणारे फायदे म्हणजे यात संपूर्ण भारतात अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि फ्री नॅशनल रोमिंगचा लाभ मिळतो. तसेच युजर्सना 300 फ्री SMS चा लाभ देखील मिळतो.
