AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hormuz Strait : अमेरिकेला जबर धक्का, इराणच्या हद्दीत घुसताच लष्कराची धडक कारवाई; युद्ध भडकणार?

इराणने अमेरिकेचे दोन ड्रोन नष्ट केले आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या (IRGC) दाव्यानुसार अमेरिकेचे दोन ड्रोन दक्षिण समुद्र किनाऱ्यावर असलेल्या खमीर या बंदराजवळ आले होते.

Hormuz Strait : अमेरिकेला जबर धक्का,  इराणच्या हद्दीत घुसताच लष्कराची धडक कारवाई; युद्ध भडकणार?
strait of hormuzImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 7:14 PM
Share

America and Iran War : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध अजूनही संपलेलं नाही. हे युद्द थांबावे यासाठी अनेक पातळीवर प्रयत्न झाले. पाकिस्ताननेही या दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु होर्मुझच्या खाडीचा मुद्दा अजूनही पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. इराण या भागातील आपले प्रभुत्त्व सोडायला तयार नाही. दरम्यान, एकीकडे कतार हा देश आता दोन्ही देशांत समेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत असतानाच हे युद्ध पुन्हा चिघळते की काय? अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार इराणने अमेरिकेचे ड्रोन हाणून पाडले आहेत.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार इराणने अमेरिकेचे दोन ड्रोन नष्ट केले आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड्सच्या (IRGC) दाव्यानुसार अमेरिकेचे दोन ड्रोन दक्षिण समुद्र किनाऱ्यावर असलेल्या खमीर या बंदराजवळ आले होते. ही माहिती मिळताच IRGC ने अमेरिकेचे दोन्ही ड्रोन हाणून पाडले आणि नष्ट केले. तस्नीम न्यूज एजंसीच्या माहितीनुसार नष्ट करण्यात आलेले दोन्ही ड्रोन हे LUCAS प्रकारातले होते.

खमीर हे इराणसाठी दक्षिणेतील तटीय क्षेत्रातील महत्त्वाचे बंदर आहे. हे बंदर होर्मुझच्या खाडीच्या जवळ आहे. याच क्षेत्रावरून अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढलेला आहे. याच भागात काही तासांआधी तेलवाहू टँकर्स समुद्रात पेरलेल्या माईन्सला धडकले. त्यामुळेही आता दोन्ही देशात आणखी वाद वाढला आहे.

कतार देशाकडून दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली जात आहे. विशेष म्हणजे दोन्ही देश या मध्यस्थीकडे सकारात्मकपणे पाहात आहेत. असे असताना ड्रोन पाडल्याची घटना समोर आली आहे.

टँकर माईन्सवर आदळण्याची घटना कधी घडली?

होर्मुझच्या खाडीत तीन तेल टँकर पाण्याखील पेरलेल्या माईन्सवर आदळले. यामुळे या तिन्ही टँकरचा स्फोट झाला. इराणच्या मीडिया रिपोर्टनुसार हे तिन्ही टँकर अनधिकृत म्हणजेच परवानगी नसलेल्या मार्गाने जात होते. याच वेळी हे तिन्ही टँकर थेट माईन्सच्या संपर्कात आले आणि या तिन्ही टँकरचा स्फोट झाला.

Follow Us
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण