AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : फरशीवर चिवड्याचा ढिग, त्यावर बसून पॅकिंग! व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले

चिवडा सर्वांनाच आवडतो चहा- सोबत किंवा टाईमपास म्हणून तो खाल्ला जातो. पण तुम्हाला माहित आहे.त्याची ही गोड आंबट तिखट लागणारा चिवडा बनतो कसा? चिवडा तयार करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video : फरशीवर चिवड्याचा ढिग, त्यावर बसून पॅकिंग! व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी संतापले
viral newsImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 03, 2026 | 4:28 PM
Share

घाणेरडी जागा, तिथेच पडलेला तयार केलेल्या चिवड्याचा ढिग, आजूबाजूचा घाणेरडा परिसर. वाचूनच घाण वाटते ना? किळस येतोय ना? अहो पण असाच चिवडा तुम्ही चवीने खात आहात. चिवडा पॅकिंग करणाऱ्या कामगाराचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर चिवडा खाताना तुम्ही 100 वेळा विचार केल्याशिवाय राहणार नाही. बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं किती घातक असतं हे आपली आई आपल्याला ओरडून ओरडून सांगतच असते. पण आपण कसले ऐकतो. तरीही हे खाद्यपदार्थ चवीचवीनं खाल्ले जातात. मग कधीतरी आरोग्याला किती धोकादायक आहेत हे माहीत असूनही आवडीने खाल्ले जातात. पण आरोग्याचा विचार केला जात नाही. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर घाणेरडी जागा, तिथेच तयार चिवड्याचा ढिग आणि कामगाराचा अवतार बघितला तर चिवडाच काय, इतर बाहेरचे पदार्थ खाताना शंभर नाही तर हजारदा विचार कराल.

व्हिडिओमध्ये काय?

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चिवडा तयार केल्यापासून तो पॅकिंग करण्यापर्यंतचा कार्यक्रम दिसतो आहे.  ज्या ठिकाणी तयार केलेला चिवडा ठेवलाय, ती जागा कमालीची अस्वच्छ आहे. फरशीवरच चिवड्याचा ढिग आहे. त्यावरच बसून एक कामगार चिवडा पॅक करतोय. पायाखाली तुडवलेला, घाणेरड्या जागी साठवलेला चिवडा पाकीटात भरला जात आहे. तो कामगारही स्वच्छतेचे कोणतेही नियम पाळताना दिसत नाही. तो स्वतःच घामाटलेला दिसतोय.

व्हायरल व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावर नेटकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. पाकीटबंद पदार्थ खरेदी करताना सावध राहावे, असा खबरदारीचा इशारा काही नेटकरी देत आहेत. आपण नक्की काय खातोय? असा प्रश्न उपस्थित करत अशा ठिकाणी तयार होणारे खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी काहींनी केली आहे. पाकीटबंद पदार्थ खाताना काळजी घ्यावी, बाहेरचे खाणे टाळावे असा सल्ला देखील काहींनी दिला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्याची पडताळणी केलेली नाही. हा व्हिडिओ कुठला आहे, याबाबत माहिती कळू शकलेली नाही.

Follow Us
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव