AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: पिंपरी-चिंचवड तिथे काही…; एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ एका वाक्याने भाषणात रंगत, अजितदादांचा उल्लेख करत म्हणाले…

Eknath Shinde News: पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा उल्लेख करताच एकनाथ शिंदेंनी अजितदादांची आठवण काढली आहे. त्यांच्या २५ वर्षांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे.

Eknath Shinde: पिंपरी-चिंचवड तिथे काही...; एकनाथ शिंदेंच्या 'त्या' एका वाक्याने भाषणात रंगत, अजितदादांचा उल्लेख करत म्हणाले...
Eknath Shinde Speech
| Updated on: Nov 03, 2026 | 5:12 PM
Share

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आहेत. तेथे पुण्यातील माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकेचा उद्घाटन समारंभ आणि पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध प्रकल्प आणि कार्यक्रमांचे उद्घाटन पार पडले आहे. यानंतर एकनाथ शिंदेंनी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी अजितदादांची आठवण काढली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आजच्या दिवसात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाले. आता इथे पोलीस मुख्यालयाचे भूमिपूजन होत आहे. आजचा हा दिवस पिंपरी चिंचवडसाठी सुवर्ण क्षण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पोलिसांसाठी विविध उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांचं मनापासून अभिनंदन करतो. पिंपरी चिंचवड जुन्या मानाने खूप बदलत आहे. बदलच पाहिजे ही काळाची गरज आहे.

यानंतर एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांची आठवण काढली आहे. ते म्हणाले की, या शहराच्या विकासामध्ये अजित पवारांचा सिंहाचा वाटा आहे. अजित पवार यांनी २५ वर्षे विकासाचे नेतृत्व केले. अजित पवार यांनी या शहरात विविध उपक्रम आणले. आधी लोक पुण्यात राहतो असे सांगायचे. आता लोक अभिमानाने सांगतात मी पिंपरी चिंचवडमध्ये राहतो. जसे पुण्यातील लोक पुणे तिथं काय उणे असं म्हणतात, तसं पिंपरी-चिंचवड तिथे काही नाही गडबड असं म्हणावं लागेल.

एकनाथ शिंदे म्हणाले की, संकट मोठं आहे. राज्यात दुष्काळ आहे. राज्य सरकारसह केंद्र सरकार मदत करणार आहे. शेतकऱ्यांना देताना हात अकडता घेणार नाहीत. कायदा सुव्यवस्था अबाधित राखायचा असल्यास पोलिसांसाठी असलेल्या गोष्टी व्यवस्थित हव्यात. हायटेक व्हायला हवं. पोलिसांकडे आधुनिक वाहने गरजेचे आहेत. गुन्हेगारांकडे चांगली वाहने आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांकडे ही चांगली वाहने हवी आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

ते पुढे म्हणाले की, पोलिसांसाठी आम्ही जे करतो ते उपकार नाही. ते आमचं कर्तव्य आहे. एखादा काय झालं की आपण तेवढंच बघतो. मात्र त्याची मेहनत बघत नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पोलिसांनी पगारातून जी मदत केली त्यासाठी त्यांना सॅल्युट करायला हवा. पोलीस ठाण्यात जाण्यासाठी आधी नागरिक घाबरायचे. आता विश्वासाने जातात, ही प्रतिमा पोलिसांची बदलली आहे. आता त्यांना पोलीस हे आधार वाटत आहेत, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

Follow Us
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर