AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan Crisis : भारताने व्यापार थांबवला, पाकिस्तानचे वाजले की बारा, फटका इतका मोठाय की तिथले बिझनेसमॅन अक्षरश: रडकुंडीला आलेत

Pakistan Crisis : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला. आता पाकिस्तानला खऱ्या अर्थाने या निर्णयाची किंमत मोजावी लागतेय. पाकिस्तानी बिझनेसमॅनचा तिथल्या सरकारवर मोठा दबाव आहे.

Pakistan Crisis : भारताने व्यापार थांबवला, पाकिस्तानचे वाजले की बारा,  फटका इतका मोठाय की तिथले बिझनेसमॅन अक्षरश: रडकुंडीला आलेत
Paksitan PM
| Updated on: Nov 03, 2026 | 5:19 PM
Share

भारताशी पंगा घेणं पाकिस्तानला नेहमीच महागात पडतं. मग ते लढाईच मैदान असो किंवा बिझनेसचं. भारतासोबत व्यापार बंद झाल्याचा पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे 11 लाख कोटी पाकिस्तानी रुपयांमध्ये नुकसान झालं आहे. पाकिस्तानी इंडस्ट्रीजच्या प्रतिनिधींनी भारतासोबत पुन्हा व्यापार सुरु करण्याची विनंती केली आहे. पाकिस्तानचं आर्थिक नुकसान वाढत चाललं आहे. जास्त आयात खर्च, त्यात देशांतर्गत इंडस्ट्रीकडून असलेला दबाव याचा हवाला देत पाकिस्तान बिझनेस कम्युनिटीने भारतासोबत पुन्हा व्यापार सुरु करावा अशी शहबाज सरकारकडे मागणी केली आहे. “दीर्घकाळापासून असलेल्या व्यापारी अडथळ्यामुळे पाकिस्तानी व्यवसायाला आवश्यक असलेला कच्चा माल आणि इंडस्ट्रियल प्रोडक्ट दुसऱ्या देशांकडून खरेदी करावा लागतोय. एकतर डिलीवरीला वेळ लागतोय आणि सतत नुकसान वाढत चाललं आहे” असं काऊन्सिल चेयरमन नूर मुहम्मद कसूरी म्हणाले.

पाकिस्तान-इंडिया बिझनेस काऊन्सिलनुसार वर्ष 2019 पासून दोन्ही देशातील द्विपक्षीय व्यापार थांबल्यापासून पाकिस्तानचं सतत नुकसान होतय. एका बिझनेस एडवोकेसी ग्रुपनुसार 2019 मध्ये व्यापार थांबल्यापासून पाकिस्तानचं जवळपास 40 अब्ज डॉलरचं नुकसान झालं आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान सोबतचा व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी इंडस्ट्रीच्या प्रतिनिधींनुसार व्यावसायिक संबंध पुन्हा सुरु केल्यास फार्मास्यूटिकल्स, टेक्सटाइल, शेती आणि पेट्रोलियमचा आयात खर्च कमी होऊ शकतो.

पाकिस्तानी औषध उद्योगाचं किती नुकसान झालय?

भारतासोबत व्यापार सुरु केल्यास पाकिस्तानच्या फार्मा इंडस्ट्रीची जवळपास तीन अब्ज डॉलरची बचत होईल. कसूरी यांच्यानुसार भारताकडून आवश्यक कच्चा मालाची आयात सुरु केल्यास मोठा फायदा होऊ शकतो. भारताकडून कच्चा माल आयात केल्यास पाकिस्तानी औषध कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि पुरवठा साखळीमध्ये सुधारणा होण्यास मदत मिळू शकते.

कपडा उद्योगाचं किती नुकसान?

पाकिस्तानी कपडा उद्योगाला सुद्धा भारताशी पंगा घेण्याची किंमत मोजावी लागत आहे. ट्रेड थांबल्यानंतर खासकरुन देशांतर्गत कॉटन उत्पादनात घसरण झाली आहे. आयातीवरील अवलंबित्व वाढलं आहे. ब्राझील, इजिप्त, चीन आणि अमेरिकेसारख्या देशाकडून कापूस मागवल्यानंतर कापड बनवणाऱ्यांना जवळपास पाच अब्ज डॉलरचा अतिरिक्त खर्च उचलावा लागत आहे.

फार्मास्यूटिकल्स आणि टेक्सटाइल इंडस्ट्रीशिवाय पाकिस्तानला अनेक गरजेच्या गोष्टींची दुसऱ्या देशातून आयात करावी लागत आहे. भारताकडून ही आयात करताना खर्च कमी व्हायचा. साखर, खतं, सीमेंट, पेट्रोलियम उत्पादनं, लोखंड, स्टील, भाज्या आणि वजनदार मशीनरीचा यामध्ये समावेश आहे.

Follow Us
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव