Diwali Fashion Tips: यंदाच्या दिवाळीत साडीला द्या मॉडर्न टच; या 6 स्टायलिंग आयडियांनी दिसाल ग्लॅमरस
Saree Styling Tips: दिवाळीच्या दिवशी पारंपरिक कपड्यांना विशेष पसंती दिली जाते. साडी नेसूनही तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा आणि आकर्षक लूक मिळवायचा असेल, तर साडी स्टाइल करण्याच्या या 6 हटके पद्धती नक्की ट्राय करा.

दिवाळी म्हटलं की घराची सजावट, फराळ आणि नवीन कपड्यांची खरेदी यांची लगबग सुरू होते. सणासुदीच्या काळात अनेक महिला पारंपरिक पोशाखाला पसंती देतात. यामध्ये साडी हा नेहमीच आवडीचा पर्याय असतो. मात्र, दरवर्षी एकाच पद्धतीने साडी नेसण्याऐवजी यंदा त्यात काही बदल करून पाहू शकता. जुन्या साडीलाही वेगळ्या पद्धतीने स्टाइल करून मॉडर्न आणि ग्लॅमरस लूक मिळवता येतो. यासाठी ब्लाउज, बेल्ट आणि जॅकेट यांसारख्या गोष्टींचा वापर करता येईल. जाणून घेऊया साडी स्टाइल करण्याच्या ६ खास पद्धती. कॉर्सेट ब्लाउजसोबत साडी साडीला मॉडर्न लूक द्यायचा असेल, तर पारंपरिक ब्लाउजऐवजी कॉर्सेट ब्लाउजची निवड करा. जुनी सिल्क किंवा बनारसी साडी गोल्डन, मरून, काळ्या किंवा एमराल्ड ग्रीन रंगाच्या फिटेड कॉर्सेट ब्लाउजसोबत छान दिसेल. यासोबत गळ्यात स्टेटमेंट चोकर घाला आणि केसांचा स्लीक बन बांधा. पदराच्या व्यवस्थित घड्या घालून तो एका खांद्यावर घेऊ शकता. साडीपासून तयार करा लेहेंगा जुन्या साडीचा वेगळ्या पद्धतीने वापर करायचा असेल, तर तिच्यापासून घेरदार लेहेंगा तयार करू शकता. उरलेल्या कापडातून त्याला मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा ब्लाउज शिवून घ्या. साडीचा पदर दुपट्ट्याप्रमाणे स्टाइल करा. यासोबत कमरपट्टा आणि पारंपरिक झुमके घातल्यास दिवाळीसाठी सुंदर लूक तयार होईल. बेल्टसोबत साडी साडीला आकर्षक लूक देण्यासाठी कमरेला सुंदर बेल्ट लावू शकता. यासाठी एम्ब्रॉयडरी केलेला, मेटॅलिक किंवा आकर्षक डिझाइनचा बेल्ट निवडा. तो कमरेवर व्यवस्थित बसवून साडी नेसा. यामुळे कमरेचा आकार उठून दिसेल आणि संपूर्ण लूकला वेगळी स्टाइल मिळेल. यासोबत स्लीव्हलेस किंवा फुल स्लीव्ह ब्लाउज घालू शकता. धोती स्टाइलमध्ये नेसा साडी सध्या साडी नेसण्याची धोती स्टाइलही लोकप्रिय आहे. नेहमीपेक्षा वेगळा लूक हवा असेल, तर ही पद्धत नक्की वापरून पाहा. यासाठी हलकी शिफॉन किंवा जॉर्जेटची साडी निवडा. क्रॉप टॉप, पेपलम ब्लाउज किंवा फिटेड जॅकेटसोबत साडीची ही स्टाइल छान दिसते. लूक पूर्ण करण्यासाठी आकर्षक कानातले आणि हिल्स घाला. साडीसोबत लॉन्ग जॅकेट साडीला मॉडर्न आणि क्लासी लूक देण्यासाठी त्यावर लांब एम्ब्रॉयडरी केलेले जॅकेट घालू शकता. स्लीव्हलेस किंवा हेवी एम्ब्रॉयडरी असलेले जॅकेट निवडल्यास लूक अधिक आकर्षक दिसेल. जॅकेट उठून दिसण्यासाठी ब्लाउज साध्या डिझाइनचा ठेवा. यासोबत ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी किंवा कुंदनचे झुमके घालू शकता. पेपलम ब्लाउजसोबत साडी साडी नेसताना नेहमीच्या ब्लाउजऐवजी पेपलम ब्लाउजचा पर्याय निवडू शकता. साडीला कॉन्ट्रास्ट रंगाचा किंवा त्याच साडीच्या कापडापासून तयार केलेला पेपलम ब्लाउज छान दिसेल. ब्लाउजचे डिझाइन उठून दिसण्यासाठी साडी साध्या पद्धतीने ड्रेप करा. यासोबत आकर्षक कानातले आणि नेकपीस घातल्यास लूक पूर्ण होईल.
