VIDEO : पहाडोवाली मॅगीने बनवलं लखपती, रोजचा 200 कप चहा आणि 70 प्लेट मॅगीची विक्री
दोन मित्रांनी सुरू केली पहाडोवाली मॅगीचा बिझनेस तो ही बर्फाळ प्रदेशात, पार डोंगरावर. हे लोक दिवसभरात हजारोंचा व्यवसाय करतात. तर प्रत्येक वर्षाला यांचा बिझनेस लाखोंच्या पार जातो. त्यांची ही भन्नाट बिझनेस प्लॅन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

डोंगरावर फिरायला गेल्यावर त्या पहाडोवाली मॅगीचे वेध प्रत्येकाला लागतात. खरं तर काही लोक ते ट्रेकिंग सोडून तिथे मॅगी खाण्यासाठीच फार उत्सुक असतात.त्यात जर ही मॅगी बर्फाळ प्रदेशात सफर करताना खायला मिळाली तर स्वर्ग सुखचं. डोंगराळ प्रदेशात चहाची टपरी टाकायची मॅगी विकायची असा प्लॅन बऱ्याच ट्रेकर्सनी केलेला असतो. पण त्या दोन तरूणांनी चक्क हा प्लॅन सत्यात उतरवला आहे. त्यातून ते प्रत्येक वर्षाला लाखोंची कमाई करत आहेत. सध्या हे मित्र आणि त्यांचा स्टॉल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कंटेट क्रिएटर हर्ष चौहान यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी तिथल्या एका मॅगी विक्रेत्याशी संवाद साधला. एवढ्या उंचावर इतक्या लांब हा व्यवसाय चालतो कि नाही असा प्रश्न त्याने दुकानदाराला विचारला.
दुकानदाराने म्हटले की, आता सध्या मंदी चालू आहे त्यामुळे जास्त पर्यटक येत नाही. म्हणून धंदा हा जरा कमी होतो. पण त्यातही दिवसभराचत 60 ते 70 प्लेट मॅगी बनते आणि जवळपास 200 कप चहा. याशिवाय काही ग्राहक अंड्याचीही ऑर्डर्स देतात. या स्टॉलवर मॅगीची एक प्लेट 100 रूपये तर चहाचा एक कप 40 रूपयांना मिळतो. म्हणजेच दिवसाला 14 ते 15 हजाराची कमाई होते आणि महिन्याचा हा हिशोब 4.2 लाखांच्या आसपास जातो.
View this post on Instagram
आता तुम्ही विचार करा जर हा धंदा ऑफसीझनमध्ये होत असेल, तर सीझनच्या वेळेस ही कमाई किती लाखांवर, कोटींवर जात असेल. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी सध्या हा हिशोब मांडण्यात व्यस्त आहेत. हा व्हिडिओ रोहतांग पासचा असल्याचं सांगितलं असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच दुकान रोहतांगच्या जवळ नसून लाहौल खोऱ्यातील कोकसर परिसरात असल्याचं सांगितलं आहे.
यांच्या कमाईचा आकडा पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. मात्र काही नेटकऱ्यांनी या व्यवसायमागचा खर्च आणि मेहनतही लक्षात घेण्याची आठवण करून दिली आहे. डोंगराळ भागात साहित्य पोहोचवण्याचा खर्च, कडाक्याची थंडी, पाणी आणि गॅसची व्यवस्था या सगळ्या गोष्टी सोप्या नसतात.
त्यामुळे बाहेरून छोटासा दिसणारा हा स्टॉल चालवण्यासाठी दुकानदाराला बरीच मेहनत घ्यावी लागते. या व्हिडिओमधून एक गोष्ट मात्र लक्षात येते, ती म्हणजे व्यवसाय छोटा असो वा मोठा, योग्य ठिकाणी आणि योग्य मागणी असली तर त्यातून चांगली विक्री होऊ शकते.
