AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना 5000 रुपयांची मदत… CM फडणवीसांकडून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले…

ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना 5000 रुपयांच्या मदतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. विरोधकांच्या टीकेला आता मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ऐन दुष्काळात शेतकऱ्यांना 5000 रुपयांची मदत... CM फडणवीसांकडून विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर, म्हणाले...
devendra fadnavis news Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 03, 2026 | 2:16 PM
Share

पुण्यातील हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेच लोकार्पण झालं. या नव्या मेट्रो मार्गिकेमुळे  पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झालं. मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांना करण्यात येणाऱ्या 5000 रुपयांच्या मदतीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्याला आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मेट्रो मार्गिकेचं लोकार्पण झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘हिंजवडी – शिवाजीनगर मेट्रो मार्गिका ही महत्वाची होती. या मार्गात प्रचंड वाहतूक कोंडी असयाची. त्यामुळे निश्चितपणे लोकांचा वेळ वाचणार आहे. ही 23 किलोमीटरची मार्गिका असणार आहे. या मार्गिकेत 23 स्टेशन आहेत. पीपीपी पोलिसी तयार केली. पीपीपी अंतर्गत ही पहिली लाइन मान्य करण्यात आली. अनेक अडचणी या प्रकल्पात होत्या. या अडचणी दूर करत करत आज ही लाइन सुरू झालेली आहे. पुणेकरांना या मार्गिकेचा फायदा होईल. जवळपास 100 लोकोपायलट तयार केले आहेत. या सगळ्या महिला आहेत. ही पिंक लाईन आहे. या मार्गिकेचा एकूण स्टाफ हा 50 टक्के महिला आहे. या प्रकल्पाचं व्यवस्थापन होत असतानाही महत्वाच्या इंजिनीअर पदावर महिला होत्या’.

‘पुण्याच्या फेज 2 चं देखील भूमीपूजन करण्यात आलं आहे. पुण्यातील सर्व दिशांना कनेक्टिव्हीटी होणार आहे. एकूण सगळ्या लाइन पूर्ण झाल्यानंतर 120 किमीचं जाळं तयार होत आहे. हे जाळं  पुरंदरपर्यंत देखील जाणार आहे. महायुतीच्या सरकारने अनेक प्रकल्पांचं जाळं तयार केलं. पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए भागात विकासाचा प्लान तयार केला जात आहे. या पंतप्रधान मोदींचे देखील आभार. त्यांनी पीएमआर ग्रोथ सेंटरसाठी 5 हजार कोटी रुपये देणार आहेत. त्यातून पुढील काम करणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.

विरोधकांच्या टीकेला फडणवीस म्हणाले, ‘ज्यांना मोठ्या गाड्यातून फिरायची सवय आहे. मोठ्या घरात राहायची सवय आहे. त्यांना 5 हजारांचं महत्त्वं कळणार नाही. ते शेतकऱ्यांना कळतं.  ही अग्रीम मदत आहे. शेतकऱ्यांना मदत करणार आहोत. आधीचा इतिहास काढला, तर शेतकऱ्यांना सर्वाधिक मदत ही महायुती सरकारनेच दिली आहे. याआधीच्या सरकारने तोंडाला पान पुसली. तेच आता बोलत आहेत. पण ते काही बोलले तरी आम्ही मदत करू. पंतप्रधान मोदींनीही महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. यामुळे मदतीचे आश्वासन दिलं आहे. त्यांची मदत आणि राज्याची मदत मिळून शेतकऱ्यांना पायावर उभे करू’.

Follow Us
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर
गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने...
Gokul : Mahayuti : गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा