Ahilyanagar District Central Cooperative Bank Ltd election Result : अहिल्यानगरात कुणाचा खेळ खल्लास? कुणी उधळला विजयाचा गुलाल; वाचा निकाल A टू Z
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या १० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत, ज्यात भाजपने दणदणीत विजय मिळवला. या विजयामुळे जिल्ह्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व पुन्हा सिद्ध झाले. एकूण २१ जागांपैकी ११ जागा बिनविरोध आल्या होत्या, तर उर्वरित जागांवर चुरशीची लढत झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही काही ठिकाणी यश संपादन केले.

अहिल्या नगर जिल्हा बँकेच्या उरलेल्या दहाही जागांचा निकाल अखेर लागला आहे. या बँकेच्या एकूण 21 जागांची निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी 11 जागा आधीच बिनविरोध आल्या आहेत. आज 10 जागांचे निकाल लागले आहेत. अत्यंत चुरशीच्या असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवून विजयाचा गुलाल उधळला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही काही ठिकाणी यश मिळवलं आहे. या निकालामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 10 जागांचे निकाल
राहुरी विविध कार्यकारी सेवा संस्था
प्राजक्ता तनपुरे – भाजप विखे थोरात सहकार विकास पॅनल विरुद्ध सत्यजीत कदम- भाजप समर्थक अपक्ष लढला विजयी –प्राजक्त तनपूरे
शेतीपूरक संस्था
आशुतोष काळे-राष्ट्रवादी विखे थोरात सहकार विकास पॅनल विरुद्ध सुधीर मस्के – निलेश लंके, सदाशिव लोखंडे – सहकार परिवर्तन पॅनल विजयी – आशुतोष काळे-राष्ट्रवादी
महिला राखीव
अनुराधा नागवडे – विखे थोरात सहकार विकास पॅनल विरुद्ध हर्षदा काकडे, निलेश लंके, सदाशिव लोखंडे – सहकार परिवर्तन पॅनल विजयी- अनुराधा नागवडे -काँग्रेस
संगीता वाघ – विखे थोरात सहकार विकास पॅनल विरुद्ध संध्या महांडुळे, निलेश लंके, सदाशिव लोखंडे – सहकार परिवर्तन पॅनल संगीता वाघ-विजयी -भाजप
भटक्या जमाती
गणपत सांगळे – विखे थोरात सहकार विकास पॅनल विरुद्ध प्रताप ढाकणे, निलेश लंके, सदाशिव लोखंडे – सहकार परिवर्तन पॅनल विजयी- गणपत सांगळे-काँग्रेस
अनुसूचित जाती जमाती
वैभव पिचड – विखे थोरात सहकार विकास पॅनल विरुदध प्रशातं लोखंडे निलेश लंके सदाशिव लोखंडे – सहकार परिवर्तन पॅनल विजयी वैभव पिचड-भाजप
इतर मागासवर्गीय जाती
कारभारी जावळे – विखे थोरात सहकार विकास पॅनल विरुद्ध जालिंदर वाघचौरे, निलेश लंके, सदाशिव लोखंडे – सहकार परिवर्तन पॅनल विजयी-कारभारी जावळे-भाजप
निलेश लंके सदाशिव लोखंडे – सहकार परिवर्तन पॅनल
पारनेर विविध कार्यकारी सेवा संस्था
निलेश लंके विरुद्ध राहुल शिंदे-विखे समर्थक विजयी-निलेश लंके -राष्ट्रवादी
कर्जत विविध कार्यकारी सेवा संस्था
ज्योती शिंदे- राम शिंदे प्रणित उमेदवार विरुद्ध तुषार पिसाळ-अपक्ष विजयी-ज्योती शिंदे- राम शिंदे प्रणित उमेदवार-भाजप
अकोले विविध कार्यकारी सेवा संस्था
संजीवनी शिंदे- अपक्ष विरुद्ध किरण लहामटे-राष्ट्रवादी विजयी-संजीवनी शिंदे- अपक्ष
बिनविरोध –
विखे थोरात सहकार विकास पॅनल
सुजय विखे राहता विविध कार्यकारी सेवा संस्था-भाजप
अक्षय कर्डिले नगर तालुका विविध कार्यकारी सेवा संस्था-भाजप
बिपिन कोल्हे कोपरगाव विविध कार्यकारी सेवा संस्था-भाजप
शंकरराव गडाख नेवासा विविध कार्यकारी सेवा संस्था-ठाकरे शिवसेना
मोनिका राजळे पाथर्डी विविध कार्यकारी सेवा सोसायटी-भाजप
रणजितसिंह देशमुख संगमनेर विविध कार्यकारी सेवा संस्था. काँग्रेस (बाळासाहेब थोरात यांचे जावई)
राजश्री घुले शेवगाव विविध कार्यकारी सेवा संस्था-राष्ट्रवादी
करण ससाने श्रीरामपूर विविध कार्यकारी सेवा संस्था-काँग्रेस
सचिन जगताप बिगर शेती संस्था-राष्ट्रवादी
दत्तात्रय पानसरे श्रीगोंदा विविध कार्यकारी सेवा संस्था-राष्ट्रवादी
सचिन घुमरे जामखेड विविध कार्यकारी सेवा संस्था-भाजप
