AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेत आहात, मोर्चे कसले काढताय? राज ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुलंवरील दिनदर्शिकेचं प्रकाशन केलं. पुलं देशपांडेंवर व्यंगचित्र काढायची आणि त्याची दिनदर्शिका करायची ही कल्पना अभिनव आहे. हे कॅलेंडर पाहून, चित्र पाहून नवीन पिढीत पुलं देशपांडे वाचावेसे वाटतील, पुस्तकं विकत घेऊन लोक वाचतील, अशी आशा आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

सत्तेत आहात, मोर्चे कसले काढताय? राज ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
Raj Thackeray Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 03, 2026 | 1:43 PM
Share

फक्त सत्ता येऊन चालत नाही. सत्ता अंगात असावी लागते. भाजप अजून विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडला नाही. तर काँग्रेसला विरोधी पक्ष कसा असतो हे आता आता कळायला लागलंय, असं सांगतानाच तुम्ही सत्तेत आहात. लोकशाही वाचवा म्हणून मोर्चा काढत आहात. तुम्ही सत्तेत आहात ना? मोर्चे कसले काढताय? कशासाठी काढत आहात? असा संतप्त सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. काल केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तेलंगणात ‘लोकशाही वाचवा’ रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी टीका केली.

कार्टुनिस्ट अलोक यांनी पुलं देशपांडे यांच्यावर दिनदर्शिका तयार केली आहे. त्याचं उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. आधी आलेला निवडणुकीचा अंदाज चुकला. त्यापूर्वीच काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. ही विधान परिषदेची निवडणूक आहे. ती काही ठिकाणी झाली. त्यावर पंतप्रधान ट्विट करतात? मी आजवर कोणत्याच पंतप्रधानांनी असं ट्विट केलेलं पाहिलं नाही. कारण भाजप अजूनही विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतून बाहेरच आलेला नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

भलत्याच दरवाज्यावर बेल वाजवली

यावेळीत्यांनी पुलं देशपांडे यांचा किस्साही ऐकवला. पुलंना बघण्याचा अनुभव अनेकदा आला. पण भेटण्याचा एकदाच आला. बाळासाहेब ठाकरे आणि पुलंचा वाद झाला होता. तो वाद होऊन गेला होता. सहा महिने झाले होते. त्यावेळी मी पुण्यात होतो. त्यांना भेटावं वाटलं. माझी त्यांच्याशी ओळख नव्हती. मी माझे सासरे मोहन वाघांना फोन केला. म्हटलं मला पुलंना भेटायचं आहे. त्यांनी पुलंशी चर्चा केली. सकाळी 8 वाजता भेटायचं ठरलं. भांडारकर रोडला पुलं राहायचे. मी सकाळी तिथे पोहोचलो. पुलं आतल्या इमारतीत राहत होते. माझ्या मागून एक माणूस येत होता. मी आत गेलो तर तोही तो आला. मी इमारतीत शिरलो. तोही शिरला. मी बेल वाजवली. माझ्या मागून आवाज आला. राज तिथे नाही, इथे. मी भलत्याच्या दरवाजाची बेल वाजवत होतो, असा किस्सा राज यांनी सांगितला.

आता आदर वाढला असेल ना?

सुनिता बाईंनी मला आत बोलावलं. मला तो दरवाजा आठवतो. बाजूला पुस्तकं होती. मी आत गेलो. त्यावेळी पुलंची तब्येत बरी नव्हती. तो माणूसही आत बसला. मला वाटलं तो त्यांच्या परिचयाचा असावा. मग सुनीता बाईंनी गप्पा मारायला सुरुवात केली. बाळासाहेबांचे किस्से सांगायला लागल्या. त्या म्हणाल्या, बाळ (बाळासाहेब ठाकरे) हा भाईंचा (पुलं देशपांडे) विद्यार्थी आहे. आणि श्रीकांत (श्रीकांत ठाकरे) हा माझा विद्यार्थी आहे. त्यानंतर त्या बाजूला बसलेल्या माणसाने पुलंकडे आश्चर्याने पाहिलं. म्हणाला, बाळासाहेब तुमचे विद्यार्थी? त्यावर पुलंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि म्हटलं, आदर वाढला असेल ना आता माझ्याबद्दल, असं राज यांनी सांगताच एकच खसखस पिकली.

पुन्हा पुलंना भेटलो

त्याही प्रसंगात तब्येत बरी नसताना पुलंचा ह्युमर गेला नव्हता. नंतर मी बाहेर आलो. आणि बाळासाहेबांना फोन केला. पुलंना भेटल्याचं सांगितलं. पुलंची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं. त्यानंतर मुंबईला आलो. बाळासाहेबांना घेऊन पुन्हा पुण्याला आलो. तेव्हा पुलं आणि बाळासाहेबांची भेट झाली. त्यामुळे मला दोनदा पुलंना भेटण्याची संधी मिळाली. मी आधीच भेटायला हवं होतं. पण आजारपणात का होईना त्यांना भेटलो ही काय कमी गोष्ट आहे का? असं ते म्हणाले.

Follow Us
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर
गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने...
Gokul : Mahayuti : गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून
Mahayuti : गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून महायुतीत नाराजीचा सूर
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी
NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी