AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारी योजना, अनुदानाची माहिती एका क्लिकवर, ॲग्री वेल्फेअर पोर्टल शेतकऱ्यांसाठी वरदान

Agri Welfare Portal : देशातील शेतकऱ्यांना आता सरकारच्या विविध कृषी योजना एकाच पोर्टलवर दिसतील. त्यांना एकाच ठिकाणी या योजनांची माहिती घेता येईल आणि अनुदानाचीही माहिती घेता येईल. ॲग्री वेल्फेअर पोर्टल हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

सरकारी योजना, अनुदानाची माहिती एका क्लिकवर, ॲग्री वेल्फेअर पोर्टल शेतकऱ्यांसाठी वरदान
सरकारी योजना, अनुदानाची माहिती एका क्लिकवर, ॲग्री वेल्फेअर पोर्टल शेतकऱ्यांसाठी वरदान
| Updated on: Nov 03, 2026 | 1:51 PM
Share

Agri Welfare Portal: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी योजना, अनुदान आणि इतर माहिती एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहे. बळीराजाला सर्व लाभ पारदर्शकपणे मिळावे यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सरकारी योजनांची माहिती घेण्यासाठी सरकारी कार्यालयाची उंबरठे झिजवण्याची गरज नाही. केवळ विविध योजनाच नाही तर हवामानाची स्थिती, पावसाचा अंदाज, बियाणे आणि खतांची उपलब्धता, पिकाचे दरपत्रक याची माहिती या पोर्टलवर मिळणार आहे.

सुविधा अनेक, पोर्टल एक

ॲग्री वेलफेअर पोर्टलच्या माध्यमातून कृषी मंत्रालयाच्या विविध योजना, सबसिडी, हवामान, खते आणि बियाणे यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना विविध शासकीय कार्यालयात जाण्याची गरज नाही. ते त्यांच्या स्मार्टफोनवरून अथवा जवळील महा ई सेवा केंद्रावरून शेतीशी संबंधित सर्व योजनांची माहिती एका क्लिकवर मिळवू शकतील. या पोर्टलमुळे सर्व सरकारी योजना एकाच छताखाली आल्या आहेत. या पोर्टलवर कोणत्याही योजनेसाठी कसा अर्ज करावा. त्यासाठी कोणकोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील. सबसिडी कशी मिळेल. कोणती कागदपत्रं जोडावी लागतील याची माहिती मिळेल. थेट लाभ हस्तांतरण-DBT योजनांची माहिती सुद्धा आणि आर्थिक सहाय्याशी संबंधित माहिती शेतकर्‍यांना एका क्लिकवर मिळेल.

योजनांची सविस्तर माहिती

ॲग्री वेल्फेअर पोर्टल हे केंद्रीय कृषी मंत्रालयाने विकसीत केले आहे. यामध्ये पीएम किसान योजना, पीक विमा योजना, शेततळे अनुदान, सिंचन योजना, ट्रॅक्टर आणि कृषी यांत्रिकीकरण अनुदान योजना यासारख्या विविध योजनांची सविस्तर माहिती एकाच क्लिकवर मिळेल. शेतकरी स्मार्टफोनच्या माध्यमातून या पोर्टलवर योजनांची, अनुदानाची, हवामानाची माहिती घेऊ शकतील. तसेच त्यांच्या अर्जाची स्थितीही त्यांना तपासता येईल.

हवामानापासून ते बाजारभावाची थेट माहिती

या पोर्टलवर शेतकऱ्यांना हवामानातील बदल, बियाणे आणि खतांची उपलब्धता, बाजारातील पिकांचे दरपत्रक आणि इतर आवश्यक माहितीही मिळेल. या पोर्टलच्या माध्यमातून हवामान, शेतीचे नवीन तंत्रज्ञान आणि बाजारभावाशी संबंधित अद्ययावत माहिती दिली जाईल. शेतकर्‍यांना पेरणी, पिकांची काळजी आणि विक्रीची तयारी याविषयीची माहिती या पोर्टलवर मिळेल. कृषी विभागाने शेतकऱ्यांना या पोर्टलचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तर कोणत्याही योजनेसाठी अर्ज करताना निकष, अटी आणि शर्तींचे पालन करण्यास सांगितले आहे.

Follow Us
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो;
पुणे मेट्रो मार्गिका 3 ठरणार देशातील पहिली 100% महिला संचालित मेट्रो; सुनेत्रा पवारांनी सांगितली खास वैशिष्ट्ये
कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत....
Satara Bank Election Result : कराडमध्ये उदयसिंह पाटील उंडाळकरांची दणदणीत बाजी; 100 मते मिळवत धनाजी पाटलांचा पराभव
माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले; पंकजा मुंडेंचं..
Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले... पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर
गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने...
Gokul : Mahayuti : गोकुळमध्ये महायुतीची नवी खेळी; चार शासकीय सदस्यांच्या नियुक्तीने सत्तासमीकरण बदलणार?
तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी....
Tusshar Kapoor : तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने धमकीचा फोन? 5 कोटींची खंडणी मागितल्याचा दावा
गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून
Mahayuti : गोकुळमध्ये मित्रपक्षांना डावलल्याचा आरोप; शासन नियुक्त सदस्य निवडीवरून महायुतीत नाराजीचा सूर
पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी
NCP : निर्णय घेताना वरिष्ठांना विश्वासात घ्या...; पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची नाराजी