Satara District Central Cooperative Bank Ltd election Result Update : सातारा जिल्हा बँक निकाल जाहीर, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादीला मिळाली भाजपचा बदला घेण्याची संधी
Satara District Central Cooperative Bank Ltd election Result Update : राजकारणात कधी काहीही घडू शकतं. काही महिन्यांपूर्वी भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे सदस्य फोडून जिल्हा परिषदेची सत्ता मिळवलेली. आता शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे अशी संधी चालून आली आहे.

संतोष नलावडे, प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. सगळ्यांचं या निवडणुकीच्या निकालाकडे लक्ष लागलं होतं. या निवडणूक निकालाने एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्यावेळी जे घडलेलं त्याचा बदला घेण्याची संधी मिळाली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत एकूण 21 जागा होत्या. त्यात नऊ जागांवर आधीच बिनविरोध निवड झाली होती. लढत ही 12 जागांसाठी होती. त्याचे निकाल आता जाहीर झाले आहेत. 21 पैकी 9 जागा भाजपने जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने 8 जागा आणि एकनाथ शिंदे शिवसेनेने चार जागा जिंकल्या आहेत. खरंतर सातारा जिल्हा बँकेवर महायुतीचाच वरचष्मा राहणार आहे हे निकालावरुन स्पष्ट होतं. पण जिल्हा बँकेच्या राजकारणात पक्ष विस्तारासाठी सत्ता खूप महत्वाची असते.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने जास्त जागा जिंकल्या असल्या तरी एकनाथ शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता स्थापनेची संधी आहे. भाजपला बाजूला ठेऊन हे दोन्ही पक्ष सत्ता मिळवू शकतात. काही महिन्यांपूर्वी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपकडे सत्ता मिळवण्याइतपत बहुमत नव्हतं. पण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सदस्य फोडले होते. त्यावेळी जिल्हा परिषदेत ड्रामा घडला होता. शिंदे शिवसेनेचे नेते, मंत्री शंभुराज देसाई यांना धक्काबुक्की झाली होती. महायुतीमध्ये त्यावेळी वातावरण तापलेलं.
दोघेही विसरलेले नाहीत
भाजपने त्यावेळी जे केलेलं ते शंभूराजे देसाई आणि मंकरंद पाटील दोघेही विसरलेले नाहीत. जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने त्या सर्व गोष्टींची सव्याज परतफेड करण्याची आयती संधी चालून आली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आता काय घडामोडी घडणार याची उत्सुक्ता आहे. शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील एकत्र आले तर भाजप सर्वात मोठा पक्ष ठरुनही त्यांना विरोधी बाकांवर बसावं लागेल.
सातारा निकाल अपडेट
कोरेगाव सोसायटी
सुनील माने ४४ राष्ट्रवादी ईश्वर चिट्ठीने विजयी
सुनील खत्री भाजप ४४ पराभूत
फलटण सोसायटी
संजीवराजे नाईक निंबाळकर ७१ शिंदेसेना
समशेरसिंह नाईक निंबाळकर ६०
कराड सोसायटी
उदयसिंह पाटील १०० राष्ट्रवादी
धनंजय पाटील ४४
जावली सोसायटी
ज्ञानदेव रांजणे – ३८ भाजप
विठ्ठल गोळे – ८
महाबळेश्वर सोसायटी
रुपाली राजापुरे – ८ राष्ट्रवादी
संजय मोरे – ४
पाटण सोसायटी
शंभूराज देसाई ५८ शिंदेसेना
सत्यजीत पाटणकर ४६
माण सोसायटी
जयकुमार गोरे – ५३ भाजप
शेखर गोरे – ७
मनोज पोळ – १४
खंडाळा सोसायटी
अजय भोसले -२८ राष्ट्रवादी
संजीव गाढवे – २१
शामराव गाढवे अपक्ष -०
अनुसूचित जातीमध्ये
दिपक चव्हाण १८४२ शिंदेसेना
सत्यवान कांबळे ९१
रवींद्र बदेकर १६
सुरेश गायकवाड २१
भटके विमुक्त
अर्जुन काळे ९९९ भाजप
सुनील वाघ ९६०
ओबीसी
योगेश फडतरे १८८३ राष्ट्रवादी
संतोष पाचांगणे ८५
विणकर मजूर
चंद्रकांत जाधव २९४ भाजप
सुनील वाघ २४
बिनविरोध सोसायटी
सातारा सर्जेराव सावंत भाजप
वाई सत्यजीत वीर राष्ट्रवादी
खटाव नंदकुमार मोरे भाजप
नागरी बँका रणजीतसिंह नाईक भाजप
कृषी प्रक्रिया आमदार डॉ.अतुल भोसले भाजप
खरेदी विक्री मकरंद पाटील राष्ट्रवादी
गृहनिर्माण संस्था सोमनाथ धुमाळ भाजप
महिला राखीव
ऋतुजा पाटील राष्ट्रवादी,
मंगल पाटील शिंदेसेना
