Esha Deol: ‘मी कायम तुझ्यासोबत…’ घटस्फोटानंतर ईशा देओल हिला असं कोण म्हणालं? ‘ती’ पोस्ट व्हायरल
Esha Deol: अभिनेत्री ईशा देओल हिने घटस्फोटानंतर नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ईशा दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर ईशासाठी एका खास व्यक्तीने केलेली पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Esha Deol: अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलचं बॉलिवूडच्या सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये सामिल आहे. काही हीट सिनेमे बॉलिवूडला दिल्यानंतर ईशाने अभिनय विश्वाचा निरोप घेतला. कायम सिनेमांमुळे चर्चेत राहाणारी ईशा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. उद्योजक भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ईशा दोन मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. तर आज ईशा देओल हिच्या आयुष्यातील फार खास दिवस आहे. ईशाचा वाढदिवस आहे आणि लेकीच्या वाढदिवशी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहे. लेकीच्या वाढदिवशी फोटो पोस्ट करत हेमा मालिनी म्हणाल्या, ‘मी कायम तुझ्याच सोबत राहिल..’
हेमा मालिनी हिने ईशा देओल हिच्या वाढदिवशी इन्स्टाग्रावर दोन फोटो पोस्ट केले आहे. एका फोटोमध्ये ईशा एकटीच दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये हेमा मालिनी रेखा यांच्यासोबत आहेत. फोटो पोस्ट करत हेमा मालिनी कॅप्शनमध्ये म्हणाल्या, ‘माझी प्रिय ईशाचा वाढदिवस आहे. ईशा माझ्यासाठी माझं सपोर्ट सिस्टम आहे. ईशा आणि अहाना माझी ताकद आहे… त्या जे काही करतील, त्यामध्ये त्यांना यश मिळूदे… मी प्रार्थना करते की, तिचं आयुष्य उदंड आणि स्वस्थ असो…’
View this post on Instagram
हेमा मालिनी पुढे म्हणतात, ‘माझ्या कडेवर राहणारी एका गोंजड मुलीपासून एका समजदार मुलगी होताना तुला पाहिलं आहे. ईशाने मोठ्या समजदारीने स्वतः जीवन आणि तिच्या मुलांना फार उत्तम सांभाळलं आहे. तिने ज्या प्रकारे प्रगती केली आहे आणि ती ज्या प्रकारे विकसित झाली आहे, त्याचं मला कौतुक वाटतं. मी सदैव तिच्या पाठीशी उभा राहीन आणि तिला पूर्ण पाठिंबा देईन. देवाची कृपा तिच्यावर असो, आणि तिची सर्व स्वप्ने व ध्येये पूर्ण होवोत.’ असं देखील हेमा मालिनी म्हणाल्या.
ईशा देओलचा घटस्फोट ईशा आणि भरत यांनी 6 फेब्रुवारी 2024 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. घटस्फोटानंतर ईशाने नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ईशा हिने अभिनय विश्वात देखील पुन्हा पदार्पण केलं आहे. ईशा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
