AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Diwali 2026: लक्ष्मीपूजेत नक्की ठेवा या 5 शुभ वस्तू; घरात कधीही भासणार नाही पैशांची कमतरता!

Lakshmi Pujan 2026: दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार, लक्ष्मीपूजेच्या वेळी ताटात काही खास वस्तू ठेवल्याने घरात सुख-समृद्धी आणि धनधान्याची भरभराट होते. जाणून घेऊया अशा 5 शुभ वस्तूंबद्दल.

Diwali 2026: लक्ष्मीपूजेत नक्की ठेवा या 5 शुभ वस्तू; घरात कधीही भासणार नाही पैशांची कमतरता!
Diwali 2026Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Edited By: | Updated on: Nov 03, 2026 | 6:45 PM
Share

दिवाळी हा सुख-समृद्धी आणि आनंदाचा सण मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान गणेशाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, कार्तिक अमावस्येच्या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करतात आणि आपल्या आशीर्वादाने संपूर्ण पृथ्वीला समृद्ध करतात. त्यामुळे या दिवशी श्रद्धेने पूजा केली जाते. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजेच्या वेळी काही विशेष वस्तू ठेवणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार, या ५ वस्तू पूजेत ठेवल्याने घरात सुख-शांती आणि समृद्धी नांदते. चला तर मग, जाणून घेऊया या वस्तू कोणत्या आहेत.

कवड्या

धार्मिक मान्यतेनुसार, कवड्यांचा संबंध देवी लक्ष्मीशी जोडला जातो. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजेच्या वेळी पिवळ्या कवड्या ठेवणे शुभ मानले जाते. पूजेनंतर त्या पिवळ्या कपड्यात बांधून पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवू शकता. असे केल्याने घरात धनधान्याची वाढ होते आणि आर्थिक संकटेही दूर होतात, अशी मान्यता आहे.

कमळाचे फूल

देवी लक्ष्मीला कमळाचे फूल अत्यंत प्रिय असल्याचे मानले जाते. दिवाळीच्या पूजेत त्यांना कमळाचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. कमळाचे फूल पवित्रता, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, कमळाचे फूल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि भक्तांवर आपली कृपा कायम ठेवते.

हळकंड

हिंदू धर्मात हळदीला शुभता आणि मंगल कार्याचे प्रतीक मानले जाते. दिवाळीच्या रात्री पूजेच्या वेळी अखंड हळद म्हणजेच हळकंड ठेवणे शुभ मानले जाते. हे हळकंड देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासमोर अर्पण करावी. धार्मिक मान्यतेनुसार, यामुळे घरात शुभता कायम राहते आणि नकारात्मक गोष्टी दूर होतात.

चांदीचे नाणे

दिवाळीच्या लक्ष्मीपूजेत चांदीचे नाणे ठेवणेही विशेष शुभ मानले जाते. चांदीला शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. पूजेच्या वेळी चांदीच्या नाण्यावर हळद आणि कुंकू लावून ते देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करावे. असे केल्याने घरात धन आणि वैभवात वाढ होते, अशी मान्यता आहे.

गोमती चक्र

दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मीच्या पूजेत गोमती चक्र ठेवणेही शुभ मानले जाते. धार्मिक ग्रंथांनुसार, गोमती चक्र हे धन आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. पूजेच्या वेळी ते देवी लक्ष्मीसमोर अर्पण करावे. यामुळे घरात भरभराट कायम राहते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान