AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neelam Shirke : बरं वाटत नाही, डॉक्टरकडे तपासणी करुन येतो…लक्ष्मीकांत बेर्डे यांची ‘ती’ भेट ठरली शेवटची, मराठी अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग

Neelam Shirke On Laxmikant Berde : मराठी अभिनेत्री नीलम शिर्केनं एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग सांगितला आहे.

Neelam Shirke : बरं वाटत नाही, डॉक्टरकडे तपासणी करुन येतो...लक्ष्मीकांत बेर्डे यांची 'ती' भेट ठरली शेवटची, मराठी अभिनेत्रीनं सांगितला प्रसंग
| Updated on: Nov 03, 2026 | 6:21 PM
Share

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या सहजसुंदर अभिनयामुळे आजही त्यांचे अनेक चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात. मात्र, १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि संपूर्ण मराठी मनोरंजनविश्वावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाला अनेक वर्षे उलटली असली, तरी त्यांच्यासोबत काम केलेले कलाकार आजही त्यांच्या आठवणी सांगताना भावुक होतात. एका मुलाखतीत अभिनेत्री नीलम शिर्केनं लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतच्या शेवटच्या भेटीचा प्रसंग सांगितला.

‘पछाडलेला’ चित्रपटातून मिळाली एकत्र काम करण्याची संधी

नीलम शिर्के यांनी मराठी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. ‘वादळवाट’, ‘असंभव’ आणि ‘राजा शिवछत्रपती’ यांसारख्या मालिकांमधून त्या घराघरांत पोहोचल्या. २००४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पछाडलेला’ या चित्रपटातून त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे, हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचा शेवटचा चित्रपट ठरला. नीलम म्हणाली की, ”पछाडलेला’मध्ये लक्ष्या मामांसोबत छान ट्युनिंग झालं. ते आमचे सीनिअर जरी होते, तरी ते देखील आम्हाला चाचपडून बघायचे की, आम्ही चांगले कलाकार आहोत की नाही, की उगीचच तरुण म्हणून उचलून आणलं आहे. त्यावेळी ‘पछाडलेला’नंतर आम्ही एकत्र नाटक करायचं ठरवलं, कुमार सोनी त्याचे दिग्दर्शक होते. त्या नाटकाचं नाव होतं ‘मी बबन प्रामाणिक’. त्याच्यामध्ये मी, लक्ष्या मामा, प्रसाद ओक आम्ही तिघे होतो आणि बाकी सगळी टीम होती.’

‘त्या नाटकात ते सुपरस्टार होते, त्यांच्या इतकं नाव कोणाचं नव्हतं. प्रत्येकाच्या मालिका किंवा काही ना काहीतरी चालू होतं, पण तेवढी नावं नव्हती. एकदा रिहर्सलसाठी लक्ष्या मामा आले, आम्ही नाटकाची रिहर्सल सुरू केली आणि ते म्हणाले की, ‘मी थोडावेळ आराम करतो, मला जरा बरं वाटत नाहीये’ त्यांनी तासभर वगैरे तालीम केली असेल आणि मग ते कुमार सोनींना सांगून घरी आराम करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी रिहर्सल रुमच्या खालूनच फोन केला आणि मग कुमार सोनी पटकन रिहर्सल सोडून खाली गेले. दिग्दर्शकांना त्यांनी सांगितलं की, मी इथूनच जातो, डॉक्टरांकडे तपासणी करुन येतो, कालपासून तब्येत बरी नाहीये. त्यावेळी चेकअप करायला ते गेले, ते आम्हाला कधीच भेटले नाहीत. आम्ही लक्ष्या मामांना ते शेवटचं बघितलं.’

‘माझ्या बालपणीच्या आधीपासूनच ते मोठे स्टार होते. लहान असल्यापासूनच त्यांची कॉमेडी पाहिली होती, ज्या सुपरस्टारला आम्ही बघितलं आहे, त्यांचे प्रिया ताईबरोबरचे डान्स पाहिलेत. बालपणी त्यांना बघण्यापासून ते त्यांच्याबरोबर काम करणं, हा खूप छान अनुभव होता. अचानक आणि एकेदिवशी असं झालं की, लक्ष्या मामा नाहीत! असं कसं होईल?’ असं नीलम शेवटी म्हणाली. ‘लोकमत फिल्मी‘ला दिलेल्या मुलाखतीत नीलम शिर्के बोलत होती.

Follow Us
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...