AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अग्निवीरांच्या पहिल्या बॅचला मिळू शकतो सेवा विस्तार?, केंद्राचा प्रस्तावावर विचार सुरु

अग्निपथ योजने अंतर्गत इंडियन आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्समध्ये ४ वर्षांसाठी भरती केले जाते.त्यांची पहिली बॅच २१ नोव्हेंबर २०२ रोजी सेवा मुक्त होत आहे. त्याच्या आधी यातील काहींचा सेवा विस्तार होऊ शकतो असे म्हटले जात आहे.

अग्निवीरांच्या पहिल्या बॅचला मिळू शकतो सेवा विस्तार?, केंद्राचा प्रस्तावावर विचार सुरु
agniveer first batch
| Updated on: Nov 03, 2026 | 6:10 PM
Share

अग्निपथ योजनेनुसार इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि एअरफोर्समध्ये चार वर्षांसाठी भरती झालेल्या अग्निवीरची पहिल्या बॅचचे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठी अपडेट आहे. केंद्र सरकारने पहिल्या बॅचच्या अग्निवीरांच्या सेवेचा विस्तार करण्याचा विचार करत आहे. हा सेवा विस्तार त्या अग्निवीरांच्या पेक्षा वेगळा असेल ज्यांना चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर नियमित सैनिक म्हणून सैन्यात कायम केले जाणार आहे.या संबंधीच्या प्रस्तावा संदर्भात गेल्या काही दिवसात दिल्लीमध्ये उच्च स्तरिय बैठकी झाल्या आहेत. अग्निवीरांची पहिली बॅच २१ नोव्हेंबर २०२६ रोजी सेवा मुक्त होत आहे.

आता अग्निवीरांची पहिली बॅच निवृत्त होणार आहे. यातील काही अग्निवीरांना सैन्यात कायम केले जाणार आहे. तर काही अग्निवीरांचा सेवा विस्तार केला जाणार आहे. या सेवा विस्ताराचा कालावधी नेमका किती असणार आहे हे पाहूयात…

अग्निपथ योजना काय ?

अग्निपथ योजनेची सुरुवात १४ जून २०२२ रोजी झाली होती. या अंतर्गत १७.५ ते २१ वयाच्या तरुणांना भारतीय सैन्य दल, नौदल आणि वायू सेनेत चार वर्षांसाठी अग्निवीर म्हणून भरती केली जाते. चार वर्षांच्या सेवे दरम्यान अग्निवीरांना दर महिन्याला वेतन आणि अन्य सुविधा मिळतील. सेवा पूर्ण झाल्यानंतर त्यांना सुमारे 11.71 लाख रुपयांचा सेवा निधी रक्कम दिली जाते. मात्र,या योजनेनुसार सेवा पूर्ण करणाऱ्यांना अग्निवीरांना नियमित सैनिकांसारखे पेन्शन मिळत नाही.

25% अग्निवीर होणार कायम तर 75% निवृत्त

अग्निपथ योजनेच्या नियमानुसार प्रत्येक बॅचच्या कमाल २५ टक्के अग्निवीरांना चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर नियमित कॅडरमध्ये सामील केले जाऊ शकते. यासाठी अग्निवीरांची कामगिरी, योग्यता, संघटनेची गरज आणि संबंधित सैन्याचे धोरण ध्यानात घेतले जाणार आहे.

उर्वरित 75 टक्के अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेनंतर मुक्त करण्याचा नियम आहे. त्यांना सेवा निधीसह भविष्यात रोजगार आणि अन्य संधी देण्याची व्यवस्था केली आहे.गेल्या महिन्यात भारतीय वायूसेनेने आपल्या पहिल्या अग्निवीर वायू बॅचच्या २,८५० जवानांपैकी ७१२ जणांना नियमित सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

21 नोव्हेंबरला सेवा मुक्त होतेय पहिली बॅच, त्याआधी निर्णय

अग्निपथ योजने अंतर्गत भरती झालेल्या अग्निवीरांची पहिली बॅच २१ नोव्हेंबर रोजी सेवा मुक्त होत आहे. त्यात त्यांना संभाव्य सेवा विस्तार देण्याच्या निर्णयाला महत्वाचे मानले जाते आहे. तसेच सेवा विस्ताराचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर अग्निपथ योजनेअंतर्गत भरती झालेल्या जवानांच्या भविष्य आणि सैन्याच्या मनुष्यबळ धोरणात एक महत्वाचा बदल पाहायला मिळू शकते. मात्र,यावर अजूनपर्यंत कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. असे म्हटले जात आहे की सेवा विस्ताराचा निर्णय २१ नोव्हेंबरच्या आधी होऊ शकतो.

किती सेवा विस्तार मिळेल ?

अग्निवीरांना सेवा विस्तार देण्याच्या. प्रस्तावावर कोणताही अधिकृत्त निर्णय झालेला नाही. जर सेवा विस्ताराला मंजूरी मिळाली तर त्याचा अवधी किती असेल आणि कोणत्या अग्निवीरांना त्याचा लाभ होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Follow Us
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...