AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोळे लावले की दिसतो साप, झोपेत पडतंय स्वप्न; नेमके संकेत काय? चांगलं होणार की संकट येणार?

अनेकांना झोपेत साप दिसतो. त्यामुळे झोपेतून दचकून जाग येते. काही जणांना त्या स्वप्नाची भीती वाटते, मग दिवसभर तेच विचार डोक्यात सुरू असतात. पण तुम्हाला माहित आहे की साप झोपेत का दिसतात? त्यामागे काय नेमका काय अर्थ दडलेला असतो. चला जाणून घ्या

डोळे लावले की दिसतो साप, झोपेत पडतंय स्वप्न; नेमके संकेत काय? चांगलं होणार की संकट येणार?
snake in dreamImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 03, 2026 | 6:27 PM
Share

रात्री शांत झोप लागलेली असते आणि अचनाक स्वप्नात साप दिसतो. कधी तो आपल्या समोर फणा काढून उभा असतो, तर कधी आपला पाठलाग करत असतो. काही वेळा तर साप चावल्याचंही स्वप्न पडतं. असं स्वप्न पडल्यानंतर अनेक जण घाबरून जातात. सकाळी उठल्यावरही मनात त्याचाच विचार सुरू असतो. आता याचा अर्थ काय? काही वाईट घडणार तर नाही ना? असे प्रश्न पडतात.विशेष म्हणजे भारतीय संस्कृतीत सापाला धार्मिक आणि अध्यात्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्व दिलं जातं.

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात साप दिसणं प्रत्येक वेळी अशुभ मानलं जात नाही. साप कोणत्या रंगाचा होता. तो काय करत होता आणि स्वप्नात नेमकी कोणती घटना घडली, यावर त्याचा अर्थ अवलंबून असल्याचं सांगितलं जातं. चला तर जाणून घेऊया स्वप्नात साप दिसण्यामागे कोणते अर्थ सांगितले जातात.

स्वप्नात काळा साप दिसणे

स्वप्नात काळा साप दिसल्यास अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. पारंपरिक स्वप्नांच्या अर्थांनुसार, काळ्या सापाचा संबंध मनातील भीती,चिंता किंवा नकारात्मक विचारांशी जोडला जातोय. काही लोक याला आयुष्यातील एखाद्या कठीण परिस्थितीचं प्रतीक मानतातं. मात्र याचा अर्थ भविष्यात काहीतरी वाईट घडणार असा होत नाही.

स्वप्नांना पांढरा साप दिसणे

पांढऱ्या रंगाचा साप स्वप्नात दिसणं काही पारंपरिक मान्यतांनुसार शुभ मानलं जातं. याचा संबंध सकारात्मक बदल,शांतता आणि नवीन संधीशी जोडला जातो. काही लोक याला भाग्योदयाचं संकेत मानतात. मात्र या अर्थांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

साप चावल्याचं स्वप्न पडणे

स्वप्नात साप चावतोय असं दिसलं तर अनेकजणं घाबरून जागे होतात. स्वप्नशास्त्रातील काही मान्यतांनुसार, साप चावण्याच्या स्वप्नांचा संबंध आयुष्यातील बदल किंवा एखाद्या अडचणीशी जोडला जातो. तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अशा संबंधाना भीती, तणाव किंवा असुरक्षिततेच्या भावनेशी असू शकतो.

अनेक साप एकत्र दिसणे

एकाच स्वप्नात अनेक दिसले तर त्याचा अर्थ काय? काही पारंपरिक समजुतींनुसार, अनेक साप दिसणं हे मनातील गोंधळ, चिंता किंवा आयुष्यातील अनेक प्रश्नांची प्रतीक मानलं जातं. एखाद्या गोष्टीबद्दल मनात असलेली भीतीही अशा स्वप्नातून व्यक्त होऊ शकते

साप आपला पाठलाग करताना दिसणे

स्वप्नात साप आपल्या मागे लागलेला दिसतो आणि आपण त्याच्यापासून पळत असतो. असं अनेकांना स्वप्न पडतं. अशा स्वप्नाचा संबंध एखाद्या समस्येतून दूर जाण्याची इच्छा,मनातील दडपण किंवा एखाद्या गोष्टीचा सामना करण्याची भीती यांच्याशी जोडला जाऊ शकतो.

स्वप्नात साप दिसला म्हणजे भविष्यात काहीतरी शुभ किंवा अशूभ घडणार असं विज्ञान सांगत नाही. झोपेच्या दरम्यान मेंदू दिवसभरातील अनुभव, आठवणी, भावना आणि मनातील विचार यांच्याशी संबंधित प्रक्रिया करत असतो. त्यामुळे कधी भीतीदायक तर कधी आनंददायी स्वप्न पडू शकतात. दिवसभरात सापाबद्दल काही पाहिलं असेल, तर त्याचाही स्वप्नांवर परिणाम होऊ शकतो.

Follow Us
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले
पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi On Pune Metro : पुण्यातील हिंजवडी मेट्रोचे पंतप्रधान नेरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील; मेट्रो उद्घाटनावेळी शिंदेंचं विधान
पुण्याबाबत अजित पवार संवेदनशील होते, ते... मेट्रो प्रकल्प उद्घाटनावेळी एकनाथ शिंदेंचे विधान
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; SIT प्रमुख अमरसिंग जाधवांसह...