AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला जे पाहिजे तेच घडतंय, अत्यंत आनंदाची बातमी, तेल आणि एलपीजीचे नो टेन्शन, ओमान..

Hormuz Agreement over Strait of Hormuz : इराण आणि अमेरिका यांच्यात प्रचंड तणाव वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोठे हल्ले होत आहेत. होर्मुज खाडीत जहाजांना टार्गेट करून हल्ले होत आहेत. यादरम्यानच आता भारतासाठी अत्यंत आनंदाची बातमी पुढे येत आहे.

भारताला जे पाहिजे तेच घडतंय, अत्यंत आनंदाची बातमी, तेल आणि एलपीजीचे नो टेन्शन, ओमान..
Oil and LPG
| Updated on: Aug 03, 2026 | 1:34 PM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात तणाव गेल्या काही दिवसांपासून बघायला मिळतोय. 28 फेब्रुवारीपासून या युद्धाला सुरूवात झाली. ज्यानंतर होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली. होर्मुज खाडीत मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाहतूक होते. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून होर्मुज खाडी बंद करण्यात आली. होर्मुज खाडी बंद असल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव गगणाला पोहोचले. भारतात देखील पेट्रोल डिझेलच्या किमती वाढताना दिसल्या. होर्मुज खाडी बंद असल्याने भारताला मोठा फटका बसला. त्यानंतर आता दोन्ही देशातील युद्ध थांबले आहे. काही दिवसांकरिता युद्धविराम करार जाहीर करण्यात आला. अमेरिकेने घोषणा केली की, आम्ही इराणवरील हल्ले थांबवत आहोत. अमेरिका इराणवर मोठे हल्ले करताना दिसली. मात्र, शेवटपर्यंत इराणनेही हार मानली नाही.

यादरम्यानच आता भारतासाठी आनंदाची बातमी पुढे येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे होर्मुज खाडी असुरक्षित आहे. जहाजांवर मोठे हल्ले केले जात आहेत. आता या परिस्थितीत ओमानने मध्यस्थीची भूमिका म्हणून पुढाकार घेतला. ओमानने मांडलेल्या प्रस्तावाला इराण सकारात्मक प्रतिसाद देत आहे आणि जर त्यांनी याला संमती दिली, तर एक मोठा वाद मिटेल.

या सागरी मार्गाबाबत ओमानने मांडलेल्या प्रस्तावानुसार, या सागरी मार्गावर फक्त इराणचेच नियंत्रण राहणार नाही तर त्याऐवजी दोन्ही देशांचे नियंत्रण राहिल आणि दोन्ही देश मिळून कामकाज बघतील. अशा कोणत्याही व्यवस्थेत आपल्या मित्रराष्ट्रांना प्राधान्य दिले जाईल, असे इराणने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. इराणसोबतचे भारताचे संबंध तणावपूर्ण नसले तरीही भारत आणि ओमानचे संबंध अधिक चांगले आहेत.

ओमान आणि इराणचे होर्मुज खाडीवर नियंत्रण राहिले तर भारताचा थेट फायदा होईल. ही भारतासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. होर्मुज खाडी तेलवाहू जहाजांवर होणाऱ्या हल्ल्यात भारतीय नागरिकांना वाचवण्यासाठी ओमानचेच लष्कर पुढे आले. या युद्धाच्या पार्श्वभूमीत भारताला प्रचंड मदत ओमानने केली. यावरून दोन्ही देशातील संबंध काय आणि कसे आहेत, हे पुढे येते.

Follow Us
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?