AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगाचा ज्याची भीती होती तेच घडले, होर्मुज खाडीजवळ घडले भयंकर, भारताला झटका, थेट..

इराण आणि अमेरिका युद्ध पुन्हा एकदा पेटले आहे. त्यामध्येच धक्कादायक माहिती पुढे येतंय. अमेरिकेने इराणच्या होर्मुज खाडीच्या आसपास मोठे हल्ले केले. ज्याने खळबळ उडाली. अमेरिकेकडून इराणला मोठी धमकी देण्यात आली.

जगाचा ज्याची भीती होती तेच घडले, होर्मुज खाडीजवळ घडले भयंकर, भारताला झटका, थेट..
Gulf of Hormuz
| Updated on: Jul 16, 2026 | 8:25 AM
Share

इराण आणि अमेरिका दोन्हीकडून एकमेकांवर मोठे हल्ले केले जात आहेत. युद्ध भडकले आहे. इराण आणि अमेरिका युद्धात जगाची वाट लागते. अमेरिकेने हल्ले सुरू करताच इराण सर्वात अगोदर होर्मुज खाडी बंद करतो. होर्मुज खाडी बंद झाल्याने जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढले आहेत. शिवाय मोठात तुटवडाही निर्माण होण्याची शक्यता आहे. इराणकडून होर्मुज खाडीत मोठे हल्ले करण्यात आली. अमेरिका त्यांच्यावर हल्ले करत असल्याने त्यांनी हल्ले करण्यास सुरूवात केली आणि होर्मुज खाडीही बंद केली. अमेरिकेने रात्रभर इराणच्या काही शहरांमध्ये मोठे हल्ले केले.यासोबतच होर्मुज खाडीलाही निशाणा बनवले. यादरम्यानच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडूनही मोठी धमकी देण्यात आली होती. अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यात अनेक लोकांचे जीव गेले. यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, येणारा वेळ अत्यंत खराब असेल. त्यानंतर हल्ले अधिक तीव्र झाली.

अमेरिकेचे आता एकच टार्गेट आहे की, इराणचे सैन्य नष्ट करायचे ज्यामुळे होर्मुज खाडी पार करणाऱ्या जहाजांना त्यांच्याकडून हल्ले केले जाणार नाहीत. अमेरिकेच्या लष्कराने हेलफायर मिसाईले इराणवर टाकली. इराणी मीडियाच्या रिपोर्टनुसार, देशभरातील अनेक शहरांमध्ये हल्ल्यांचे आवाज ऐकू आली. बंदर इमाम खुमैनी, अलावा बंदर, अब्बास बंदर, रास्क आणि चाबहार येथेही धमाक्यांचे आवाज आले.

अमेरिकेने थेट बुशगर शहारालाही टार्गेट केले. गेल्या महिन्यातच युद्ध समाप्तीच्या कराराच्या उद्देशाने दोन्ही देशांनी सह्या केल्या आहेत. पण दोघेही एकमेकांवर युद्धविराम करार तोडण्याचे आरोप करत हल्ले करत आहेत. इराणकडून आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या लष्कर तळांना टार्गेट करून हल्ले केले जात आहेत. पुन्हा एकदा या युद्धात होर्मुज खाडी युद्धाचे मैदान बनली आहे.

बहरीनमध्ये अमेरिकी तळावर मोठा हल्ला इराणकडून करण्यात आला. इराण आणि अमेरिका युद्धात अनेक देशांनी मध्यस्थी केली. त्यांच्या मध्यस्थीला यश आले. मात्र, आता पुन्हा युद्ध भडकले आहे. इराण आणि अमेरिका युद्धाचा भारतालाही मोठा फटका बसतो. कारण भारतासाठी होर्मुज खाडी महत्वाची आहे. भारतात एलपीजी गॅसचा पुरवठा तिथूनच होतो.

Follow Us
जरांगे एकनाथ शिंदेंचा माणूस, सदावर्तेंचा आरोप
Gunratna Sadavarte on Manoj Jarange :  मनोज जरांगे एकनाथ शिंदेंचा माणूस; सदावर्तेंचा आरोप, उपोषणापूर्वीच अटकेची मागणी
एकदा निर्णय झाला तो झलाच! जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत आंदोलन,
Manoj Jarange : एकदा निर्णय झाला तो झलाच! जरांगे पाटलांचे अंतरवाली सराटीत आंदोलन, मुंबईतही...
साखरेचे दर घसरले पण आता दूध महागणार; किती रुपयांची होणार वाढ?
Milk Price : साखरेचे दर घसरले पण आता दूध महागणार; किती रुपयांची होणार वाढ?
सर्वसामन्यासाठी आनंदाची बातमी! अखेर साखरेच्या दरात मोठी घसरण; किती...
सर्वसामन्यासाठी आनंदाची बातमी! अखेर साखरेच्या दरात मोठी घसरण; किती रुपयांनी घट  झाली?
CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे... भर मंचावरून छगन भुजबळांचा...
CM मोटारीने आले म्हणून नाशकातील खड्डे... भर मंचावरून छगन भुजबळांचा महाजनांना टोला, नेमकं काय म्हणाले?
कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
Nepal Flood : कैलास मानसरोवर यात्रेतील 37 भाविकांसाठी फडणवीसांचा पुढाकार
मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी..
मोठी खळबळ! महायुतीत नाराजीचे सुर? प्रताप सरनाईकांचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी बदलताच... काय घडलं?
गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे... मुरलीधर मोहळ यांचं मोठं विधान
गणेशोत्सवाचे दहा दिवस मी पूर्णपणे... मुरलीधर मोहळ यांचे गणेश मंडळाबाबत मोठे विधान, नेमकं काय म्हणाले?
पुन्हा नाद करायचा... पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष तीव्र;
पुन्हा नाद करायचा... पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष तीव्र; संदीप वाघेरेंच्या बॅनरची तुफान चर्चा
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे..
नाशिकच्या शेती क्षेत्रातील क्रांती विलक्षण, फडणवीसांकडून शेतकऱ्यांचे कौतुक