मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर नाशिकमधील नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला नाशिकचे सर्व 15 नगरसेवक उपस्थित होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर नाशिकमधील नगरसेवकांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला नाशिकचे सर्व 15 नगरसेवक उपस्थित होते.
बैठकीनंतर नगरसेवकांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका स्पष्ट केली. अलीकडे ठाकरे गटातील काही खासदारांबाबत विविध चर्चा सुरू होत्या. मात्र, नाशिकमधील कोणताही नगरसेवक पक्ष सोडणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. शिवसेना शिंदे गटात नाशिकमधील 10 ते 15 नगरसेवक जाणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची वेळ मागितली होती.
उद्धव ठाकरे यांनी त्यांना दुपारी 12 वाजता भेटीसाठी बोलावले होते. या भेटीत सर्व 15 नगरसेवकांनी पक्षासोबत कायम राहण्याचे आश्वासन दिले. काही नगरसेवकांशी संपर्क साधून प्रभाग निधीसाठी 5 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा दावा यावेळी करण्यात आला. मात्र, नाशिकचे सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Published on: Jul 15, 2026 04:41 PM
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

