AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट

आता काही खरं नाही! कोर्टाच्या ‘त्या’ निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट

| Updated on: Jul 15, 2026 | 4:28 PM
Share

ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबीयांविरोधात दाखल झालेल्या प्रकरणात ठाणे न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ठाणे पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विनायक राऊत यांच्या सूनबाई गिरिजा राऊत यांनी केलेल्या तक्रारीनंतर विनायक राऊत आणि गीतेश राऊत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यानंतर संबंधितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

या प्रकरणाची पुढील सुनावणी 23 जुलै रोजी होणार आहे. तोपर्यंत न्यायालयाकडून कोणतेही संरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिस चौकशीच्या अनुषंगाने आवश्यक असल्यास संबंधितांना ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Published on: Jul 15, 2026 04:28 PM

Follow Us