AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Latur Doctor News : कार बराच वेळ एकाच जागी उभी, संशय येताच दार उघडलं आणि डॉक्टर… लातूर हादरलं, तिथे असं काय घडलं?

लातूरमधील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांची इनोव्हा कारमध्ये गंभीर अवस्थेत सापडलेल्या डॉ. राठोड यांना रुग्णालयात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले. कारमध्ये इंजेक्शनच्या बाटल्या मिळाल्याने पोलिसांनी आत्महत्येचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.

Latur Doctor News :  कार बराच वेळ एकाच जागी उभी, संशय येताच दार उघडलं आणि डॉक्टर... लातूर हादरलं, तिथे असं काय घडलं?
लातूरमध्ये कार्डिओलॉजिस्टच्या मृत्यूने खळबळ
| Updated on: Jul 16, 2026 | 8:19 AM
Share

Latur cardiologist Death : आपल्याकडे डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. रुग्णांवर उपचार करणाऱ्या, प्रसंगी त्यांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे सगळेच आभार मानतात. पण लातूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इतरांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरचा संशयास्पद परिस्थिती मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. लातूर शहरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ आणि एम. जे. हॉस्पिटलमधील वरिष्ठ कार्डिओलॉजिस्ट डॉ. मेहुल ईश्वर राठोड यांचे संशयास्पद परिस्थितीत निधन झाल्याच्या बातमीने अनेकाना धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी आत्महत्येची शक्यता व्यक्त केली असली तरी राठोड यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवाल आणि शवविच्छेदन अहवालानंतरच अधिकृत माहिती समोर येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राठोड हे लातूरमधील नावाजलेले हृदयरोग तज्ज्ञ होते. बुधवारी ते त्यांच्या इनोव्हा कारने अंबाजोगाई रोड परिसरात गेले होते. दुपारी सुमारे1.30 पासून त्यांची कार तेथेच उभी होती, असं निदर्शनास आलं. बराच वेळ उलटूनही ते रुग्णालयात परतले नाहीत आणि त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. या शोधादरम्यान अंबाजोगाई रोड परिसरात त्यांची कार आढळून आली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर डॉ. राठोड हे कारमध्ये गंभीर अवस्थेत होतें, असं आढळलं. त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात हलविॉण्यात आले. मात्र, डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही त्यांना वाचविणे शक्य झाले नाही. त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

कारमध्ये सापडलं इंजेक्शन, पोलिसांना कसला संशय ?

प्राथमिक तपासात पोलिसांना कारमधून इंजेक्शनच्या काही रिकाम्या काचेच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे डॉ. राठोड यांनी एखाद्या विषारी पदार्थाचे इंजेक्शन घेतले असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्या शीश्यांमध्ये कोणता पदार्थ होता, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरील सर्व पुरावे ताब्यात घेतले असून त्यांची तपासणी सुरू आहे.

पत्नीसह, साथीदार डॉक्टर पोहोचले, पण तोपर्यंत झाला उशीर

डॉ. राठोड यांची गाडी सापडल्याचे कळताच त्यांची पत्नी, ज्या स्वतःही वैद्यकीय व्यवसायात आहेत, त्यांनी सहकारी डॉक्टरांसह घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोर्यंत खूप उशीर झाला होता. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कार आणि परिसरातील आवश्यक नमुने तपासासाठी जप्त केले आहेत.

डॉ. राठोड यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचललं, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिस त्यांच्या मोबाईल फोनमधील माहिती, कॉल डिटेल्स, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर सर्व संबंधित बाबींची चौकशी करत आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यांच्या मृत्यूमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!