AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून मंदिर प्रशासनाने दुजाभाव केल्याची मोठी घटना घडली आहे. भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबीयांना दर्शनासाठी ताटकळत ठेवण्यात आले. तर विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबतच्या व्यक्तींना थेट व्हीआयपी दर्शनासाठी जाऊ देण्यात आले.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं
विठ्ठल मंदिर पंढरपूर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 15, 2026 | 9:35 PM
Share

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजपासून पंढरपूरमधील श्री विठ्ठल आणि रखुमाई मातेचे व्हिआपी दर्शन बंद करण्यात आले आहे. यासंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आदेश दिला आहे. या काळात वरिष्ठ शासकीय अधिकारी, मंदिर समितेचे सदस्य तसेच लोकप्रतिनिधी यांचे शिफारस पत्र किंवा इतर कुठल्याही मार्गाने कोणालाही व्हिआपी दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. परंतु व्हिआयपी दर्शन बंद केल्याच्या पहिल्या दिवशी  पंढरपुरात व्हीआयपी दर्शनाचा फज्जा उडाल्याचं पहायला मिळालं.  व्हीआयपी दर्शनावरून पंढरपुरात भाजप आणि शिवसेनेत दुजाभाव करण्यात आल्याचं समोर आलं आहे. व्हीआयपी दर्शन बंद असताना देखील मंत्र्यांसोबत आलेल्या अनेकांना थेट विठ्ठलाचं दर्शन देण्यात आलं, परंतु दुसरीकडे भाजपचे माजी मंत्री आणि आमदार असलेल्या सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मात्र दर्शनासाठी ताटकळत राहण्याची वेळ आली.

नेमकं काय आहे प्रकरण? 

पंढरपुरात व्हीआयपी दर्शनावरून मंदिर प्रशासनाने दुजाभाव केल्याची मोठी घटना घडली आहे. भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबीयांना दर्शनासाठी ताटकळत ठेवण्यात आले. तर विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींना थेट व्हीआयपी दर्शनासाठी सोडण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतचे व्हिडिओही सोशल मीडियावर  व्हायरल झाले आहेत.

यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  जिल्हाधिकारी यांनी दर्शनाला या म्हटल्यावर आपण आलो. पण मंदिरात समन्वयाचा अभाव आहे. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तर गुलाबराव पाटील यांनी आपण लोकप्रतिनिधी आहोत अडीचशे किलोमीटर वरून प्रवास करून आलो, मग दर्शनाला द्यायलाच पाहिजे, माझ्या सोबत जे लोक होते, त्यांना दर्शनासाठी थेट आत सोडले अशी कबुली त्यांनी दिली आहे.  त्यामुळे आषाढीसाठी व्हीआयपी दर्शन बंद केल्याच्या पहिल्याच दिवशी व्हीआयपी दर्शनाचा मोठा फज्जा उडाल्याचं आता पहायला मिळत आहे. दरम्यान उद्यापासून आता विठ्ठलाचं मंदिर भक्तांना दर्शनासाठी 24 तास खुलं असणार आहे. तर आजपासून व्हिआयपी दर्शन बंद करण्यात आलं आहे.

Follow Us
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...