AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माधुरी दीक्षितलाही हास्यजत्रेतल्या ‘लॉली’ची भुरळ; हुबेहूब केली नम्रता संभेरावची नक्कल, एकच पिकला हशा

Madhuri Dixit: महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील लॉलीने बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षितलाही भुरळ घातली आहे. माधुरीने चक्क लॉली या भूमिकेची हुबेहूब नक्कल करून दाखवली.

माधुरी दीक्षितलाही हास्यजत्रेतल्या 'लॉली'ची भुरळ; हुबेहूब केली नम्रता संभेरावची नक्कल, एकच पिकला हशा
नम्रता संभेराव, माधुरी दीक्षितImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 22, 2026 | 10:34 AM
Share

सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाची सूत्रसंचालक म्हणून माधुरी दीक्षित तिच्या सहज सुंदर शैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. प्रश्नांची उत्तरं आणि खेळादरम्यान, स्पर्धक आणि सेलिब्रेटी पाहुण्यांशी होणाऱ्या तिच्या दिलखुलास गप्पांमुळे प्रेक्षकांना तिच्या वैयक्तिक आयुष्याची झलक देखील पाहायला मिळत आहे, ज्यामुळे प्रत्येक भाग अधिकच खास होतो आहे. या शनिवारी असाच मनोरंजनाचा धमाका होणार आहे, कारण ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची संपूर्ण टीम या विशेष भागात येणार आहे. यावेळी माधुरीने महाराष्ट्राची हास्यजत्रा मधील सगळ्या कलाकारांविषयी दिलखुलास गप्पा मारल्या, विविध प्रश्न विचारले.

याच गप्पांच्या ओघात जेव्हा लॉलीचा विषय निघाला तेव्हा माधुरीने सांगितलं की, तिला नम्रता संभेरावची ‘लॉली’ची भूमिका खूप आवडते. हे ऐकल्यानंतर नम्रताचाही आनंद गगनात मावेनासा झाला. लॉलीबद्दल बोलताना माधुरी म्हणाली की, “मला ही लॉली खूपच आवडते.” यावर नम्रताने आश्चर्यानं माधुरीला विचारलं, “तुम्ही माझं हे कॅरेक्टर पहिलं आहे?” माधुरीने होकार देत नम्रताने केलेल्या डेंटिस्टच्या स्किटची आठवण सांगितली. त्यावर नम्रताने माधुरीला लॉलीचा एखादा डायलॉग बोलण्याची विनंती केली, आणि माधुरीने “मेरी आँखों में झाँको” हा लॉलीचा प्रसिद्ध व्हायरल डायलॉग म्हणून दाखवला, तेव्हा मंचावर एकच हास्यकल्लोळ झाला.

यावेळी नम्रताने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं हे पात्र कसं तयार झालं, याचा प्रवास उलगडला. नम्रता म्हणाली, “मी लालबागमधील एका चाळीत लहानाची मोठी झाले, लहानपणापासूनच मी चाळीतील तसंच आजुबाजूच्या बायकांचे वेगवेगळे हावभाव आणि बोलण्याच्या पद्धती जवळून पाहत आले. आमचे लेखक आणि क्रिएटिव्ह टीम नेहमीच प्रत्येक कॅरेक्टरसाठी काहीतरी वेगळं शोधण्याचा प्रयत्न करत असतात. लॉलीची हेअरस्टाईल मी स्वतःच ठरवली कारण मला ती इतरांपेक्षा वेगळी दिसावी अशी इच्छा होती. लॉली थोडंफार इंग्रजी बोलते, पण आपण ते खूप उत्तम बोलतोय असा तिला पूर्ण आत्मविश्वास असतो. अशा इथून-तिथून घेतलेल्या छोट्या गोष्टींना थोडं वाढवून-चढवून सादर केल्यानं हे अनोखं कॅरेक्टर तयार झालं.”

‘कोण होणार करोडपती’ हा शो सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता सोनी मराठी वाहिनीवर आणि सोनी लिव या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

Follow Us
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?