हे तुम्हाला CCTVमध्ये… शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
गेल्या एका आठवड्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सत्ताधारी NDA सोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विधीमंडळ परिसरातील दालनात बैठक झाल्याची माहिती समोर आली आणि राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते.

या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी या चर्चांवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. केली. याआधी बातम्या देणाऱ्या सूत्रांवर रागही व्यक्त केला. अखेर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “भवनातील फक्त मुख्यमंत्र्यांचं तसेच पंतप्रधानांचं दालन ठरलंलं असतं, महत्त्वाचं म्हणजे तुम्हालाही माहित असेल की, सर्वांची दालनं बदलत असतात, अशात जर जवळचं दालन म्हणून शरद पवारांनी बैठक घेतली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी येऊन त्यांचा सत्कार केला. यात काही वेगळं नाही. सामान्य गोष्ट आहे. हे सर्व तुम्हा भवनाच्या कॅमेऱ्यांमध्ये दिसेल. अशात जर एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठक सोडून आले तर हे त्यांचं मोठेपण आहे. मात्र यात काही राजकीय बाजू काढण्याचं कारण नाही.”
Published on: Jul 15, 2026 12:46 PM
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
परभणीत एकनाथ शिंदे यांचा भव्य शेतकरी मेळावा; महाराष्ट्राच्या राजकारणात
वैजापुरातील पानटपरीवर एफडीएची कारवाई, मुदत बाह्य पदार्थ जप्त
लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही; विद्यार्थ्यांचा...