AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : जळगावमध्ये 30 वर्षीय विवाहितेचं मुलासह अपहरण करून तिच्यावर अत्याचार

| Updated on: Jul 16, 2026 | 8:51 AM
Share

Maharashtra News LIVE Updates In Marathi: सिंहस्थपूर्वी नाशिकला तब्बल 9,129 कोटींच्या विकासकामांना मंजुरी दिली आहे. आयुक्त मनीषा खत्री यांच्या आर्थिक नियोजनामुळे अर्बन चॅलेंज फंडातून 277 कोटींचा निधी. नाशिक अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्टसाठी 58.50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra News LIVE : जळगावमध्ये 30 वर्षीय विवाहितेचं मुलासह अपहरण करून तिच्यावर अत्याचार
Breaking news

LIVE NEWS & UPDATES

  • 16 Jul 2026 08:51 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यातील 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

    यवतमाळ जिल्ह्यातील 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश. सोयाबीन बियाणांची उगवण क्षमता नसल्याच्या 832 तक्रारी मिळाल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी कंपन्यांना धरले जबाबदार. 151 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले असून 38 परवाने निलंबित केले आहेत. 15 परवाने कायमस्वरूपी रद्द केले. आठ प्रकरणांमध्ये फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी विकास मीना यांची धडक कारवाई.

  • 16 Jul 2026 08:42 AM (IST)

    कल्याण -आंबिवली रेल्वे स्थानका दरम्यान गँगची पुन्हा दहशत!

    धावत्या एक्सप्रेसमधील प्रवाशाच्या हातावर काठीने फटका मारून 30 हजारांचा मोबाईल केला लंपास. कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आरोपीचा शोध सुरू. कल्याण -आंबिवली दरम्यान फटका गँग पुन्हा सक्रिय झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण.

  • 16 Jul 2026 08:26 AM (IST)

    खरीप हंगामातील धान पिकाची नर्सरी (पर्हे) धोक्यात

    गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील धान पिकाची नर्सरी (पर्हे) धोक्यात आली आहे. पाऊस नसल्याने कोवळी रोपे सुकू लागली असून, ही रोपे वाचवण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत. अशाच एका भागात, पाणी उपलब्ध नसलेल्या शेतकऱ्याला दूरवरून बादलीची कावड बनवून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे.

  • 16 Jul 2026 08:07 AM (IST)

    मध्य रेल्वेकडून विशेष वाहतूक ब्लॉक

    मध्य रेल्वेने मशीद -सँडहर्स्ट रोड दरम्यान स्लीपर बदलण्याच्या कामासाठी 16 जुलैपासून 19 जुलैपर्यंत चार मध्यरात्री सीएसएमटी-वडाळा रोड दरम्यान विशेष वाहतूक ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज रात्री १.१५ ते पहाटे ४.१५ या वेळेत हा ब्लॉक असेल. या काळात हार्बर मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात येणार असून काही लोकल वडाळा रोडपर्यंतच धावतील.

  • 16 Jul 2026 08:05 AM (IST)

    मुंबईत केवळ ढगांची दाटी

    मुंबई शहरात आणि उपनगरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. अवघ्या चार-पाच दिवसांत मुंबईत जुलैच्या सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह उत्तर कोकण प्रदेशात विश्रांती घेतली असून आषाढ महिना सुरू झाला तरीही केवळ ढगांची दाटी दिसून येत आहे

  • 16 Jul 2026 08:04 AM (IST)

    गावातील विहिरीत आढळली चक्क मगर

    सोलापूरच्या कोरवली गावातील विहिरीत चक्क मगर आढळली. संभाजी जमदाडे या शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत मोठी मगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सोलापूर वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून या मगरीला ताब्यात घेतले. शेतातील विद्युत पंप बंद करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीच्या कडेला ही मगर दिसली. दरम्यान वन विभागाने त्या मगरीला पडकून नैसर्गिक अधिवासात सोडले.

  • 16 Jul 2026 08:03 AM (IST)

    जळगावमध्ये 30 वर्षीय विवाहितेचं मुलासह अपहरण करून तिच्यावर अत्याचार

    जळगावच्या अमळनेर तालुक्यात 30 वर्षीय विवाहितेचं मुलासह अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून आरोपी सुदाम भगवान भिल्ल याला अटक करण्यात आली आहे. सोन्याचे दागिने करण्यासाठी पैसे देतो, असं आमिष दाखवून 30 वर्षीय विवाहितेचं तिच्या मुलासह अपहरण केल्याची माहिती समोर आली आहे.

मागच्या काही दिवसांपासून गायब असलेला पाऊस पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन करु शकतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या 20 जुलैपासून पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळू शकतो. आज काही भागात पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला असून राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण होत आहे. दरम्यान यंदा पावसाला उशिराने सुरुवात झाली आहे. त्यामुळे बळीराज चिंतेत आहे. काही भागात पेरण्या रखडल्या आहेत. दरम्यान मुंबईत लोकांना उकाड्याचा अनुभव येत आहे. मुंबई शहरात आणि उपनगरात जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. अवघ्या चार-पाच दिवसांत मुंबईत जुलैच्या सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने मुंबईसह उत्तर कोकण प्रदेशात विश्रांती घेतली असून आषाढ महिना सुरू झाला तरीही केवळ ढगांची दाटी दिसून येत आहे.

Published On - Jul 16,2026 8:00 AM

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..

Gold Price Today : सोनं-चांदीचे नवे दर आले, सराफा बाजारात मोठा उलटफेर, आज किमती कमी की जास्त ? एका क्लिकवर घ्या जाणून.

Gold Price Today : सोनं-चांदीचे नवे दर आले, सराफा बाजारात मोठा उलटफेर, आज किमती कमी की जास्त ? एका क्लिकवर घ्या जाणून

Eknath Shinde Shivsena :  मुंबईत शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक आणि विधानसभा प्रमुखामध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल.

Eknath Shinde Shivsena : मुंबईत शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक आणि विधानसभा प्रमुखामध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

सयाजी शिंदे यांचा मुलगा वयाच्या 21 व्या वर्षी करतो तरी काय? दिसतो तर प्रचंड हँडसम….

सयाजी शिंदे यांचा मुलगा वयाच्या 21 व्या वर्षी करतो तरी काय? दिसतो तर प्रचंड हँडसम…

जगाचा ज्याची भीती होती तेच घडले, होर्मुज खाडीजवळ घडले भयंकर, भारताला झटका, थेट...

जगाचा ज्याची भीती होती तेच घडले, होर्मुज खाडीजवळ घडले भयंकर, भारताला झटका, थेट..

मुंबईच्या वर्दळीच्या रेल्वे स्टेशनवर तरुणांकडून दहशत; हातात लोखंडी रॉड घेऊन प्रवाशांना धमक्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.

मुंबईच्या वर्दळीच्या रेल्वे स्टेशनवर तरुणांकडून दहशत; हातात लोखंडी रॉड घेऊन प्रवाशांना धमक्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण