AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या वर्दळीच्या रेल्वे स्टेशनवर तरुणांकडून दहशत; हातात लोखंडी रॉड घेऊन प्रवाशांना धमक्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

kurla railway station : कुर्ला रेल्वे स्टेशनमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. कुर्ला स्टेशनवर तरुणांकडून दहशत निर्माण केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुंबईच्या वर्दळीच्या रेल्वे स्टेशनवर तरुणांकडून दहशत; हातात लोखंडी रॉड घेऊन प्रवाशांना धमक्या, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
| Updated on: Jul 16, 2026 | 8:31 AM
Share

मुंबईतील लोकल आणि रेल्वे स्टेशननवर प्रवाशांवर जीवघेणे हल्ले वाढले आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली होती. तर बुधवारी मध्यरात्री एकाने लोखंडी कड्याने तीन प्रवाशांवर हल्ला केल्याची घटना ताजी असताना कुर्ला रेल्वे स्टेशनवरूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य रेल्वेच्या वर्दळीच्या कुर्ला रेल्वे स्टेशनवर तरुणांकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा प्रकार समोर आलाय. कुर्ला रेल्वे स्थानकात बुधवारी रात्री एकाने लोखंडी रॉड सदृश्य वस्तू हातात घेत प्रवाशांना धमक्या दिल्याचा दावा करण्यात येत आहे. या तरुणाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला स्टेशनवर हातात लोखंडी रॉड सदृश्य वस्तू हातात घेऊन प्रवाशांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास केला. त्यावेळी कुर्ला रेल्वे स्टेशनवर बुधवारी रात्री 9.20 वाजता एक तरुण लोखंड रॉड सदृश्य वस्तू घेऊन कल्याणच्या दिशेने धावत असल्याचे व्हिडिओतून समोर आले. या तरुणामुळे प्रवाशांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळी तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचे आढळून आले. सध्या ती व्यक्ती जीआरपी कुर्ला यांच्या ताब्यात आहे. या माथेफिरूची चौकशी करण्यात येत आहे. तसेच आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू आहे.

चौकशीत काय समोर आलं?

चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तीने त्याचे नाव साजिद अब्दुल करीम चौधरी, वय 49 वर्षे, असे सांगितले. या व्यक्तीच्या हातात लोखंडी वस्तू नव्हती, तर झाडाची तुटलेली काठी आहे, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात या व्यक्तीची मानसिक स्थिती स्थिर नसल्याचे आढळून आले. परंतु रेल्वे स्टेशनवरही गुन्हे वाढू लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.  आता या माथेफिरू तरुणावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता यावर कोणती कारवाई होते, हे पाहावे लागेल. तसेच लोकल ट्रेनमधील  वाढत्या गुन्हेगारी घटनेवर रेल्वेकडून काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक