AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धावत्या लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार; दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी, दोघांची प्रकृती गंभीर

Mumbai local train crime : मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारीची घटना घडली. या हाणामारीत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत .

धावत्या लोकलमध्ये पुन्हा रक्तरंजित थरार; दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी, दोघांची प्रकृती गंभीर
| Updated on: Jul 16, 2026 | 7:49 AM
Share

मुंबई लोकलमध्ये दिवसेंदिवस हाणामारीच्या घटना वाढताना दिसत आहेत. काही आठवड्यांपूर्वी एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री दोन गटांमध्ये जोरदार हाणामारीची घटना घडल्याचे समोर आलं आहे. या हाणामारीत दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लोकलमधील हाणामारीच्या घटना वाढल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपर-अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर झोपलेल्या प्रवाशाला उठवल्याने वादाला सुरुवात झाली. लोकलमधील या वादामुळे दोन गट आमनेसामने आले. डोंबिवली स्थानकानंतर धावत्या लोकलमध्येच दोन्ही गटाची तुफान हाणामारी झाली. एकाने लोखंडी कड्याने जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीत प्रितेश कनोजिया आणि राजू वाघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलविण्यात आले. कल्याण रेल्वे पोलिसांकडून दोन्ही जखमींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

शा‍ब्दिक वादानंतर जीवघेणा हल्ला

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ लोकलमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून दोन गट भिडले. अंबरनाथ लोकलच्या लगेज डब्यात मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. शा‍ब्दिक वादानंतर हाणामारी झाल्याने एकाच्या लोखंडी कड्याच्या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले. राजू वाघे (19), साहिल खंदारे (19) आणि प्रितेश कनोजिया (31) असे जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना प्रथम रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवले.

धावत्या लोकल ट्रेनमध्ये फिल्मी स्टाइल हाणामारी

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमध्ये पुन्हा एकदा फिल्मी स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या दृश्यांमध्ये काही प्रवासी एकमेकांना मारहाण करताना दिसताहेत. त्यातील एका व्यक्तीकडून ‘मशीन काढ’ अशी धमकीवजा हाकही ऐकू येत आहे, असा दावा केला जात आहे. लोकल ट्रेनमधील हा वाद नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. लोकलमध्ये हाणामारीच्या वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम असल्याचे या नव्या व्हिडिओमुळे पुन्हा समोर आले आहे. या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी