AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Murder Case: सिया-चेतनचं अगोदरच लग्न? राजस्थानमधील त्या मंदिरात धडकले पोलीस, CCTV तं आढळलं काय? मोठा खुलासा समोर

Ketan Agrawal Murder Case Lohgad: सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचं अगोदरच लग्न झालं होतं का? राजस्थानमधील त्या मंदिरात अखेर पोलिसांचे पथक धडकले. त्यांनी या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले का?

Ketan Murder Case: सिया-चेतनचं अगोदरच लग्न? राजस्थानमधील त्या मंदिरात धडकले पोलीस, CCTV तं आढळलं काय? मोठा खुलासा समोर
केतन अग्रवाल, सिया गोयल, चेतन चौधरी
| Updated on: Jul 16, 2026 | 8:30 AM
Share

Siya Goyal and Chetan Chaudhari Marriage: केतन अग्रवाल खूनप्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलीस सर्वच कांगोरे तपासत आहे. यापूर्वी त्यांनी सियाला तिच्या घरी नेत, दुसरा मोबाईल हस्तगत केला. त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. केतनला आयुष्यात कायमचे बाद करण्यासाठी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी खतरनाक प्लॅन आखल्याचा दावा आहे. दोघांचे अगोदरच लग्न झाल्याचीही चर्चा होती. त्याची शहानिशा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे विशेष पथक राजस्थानमध्ये दाखल झाले. त्यांनी येथील मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले. पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले का? दरम्यान सिया आणि चेतनची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे.

खाटू श्याम मंदिराचं तपासले सीसीटीव्ही फुटेज

केतन अग्रवाल याच्या खूनाचा तपास करताना चेतन आणि सिया यांनी राजस्थानमध्ये गुपचूप विवाह उरकल्याची चर्चा होती. त्यादृष्टीने पोलिसांनी राजस्थानमधील प्रसिद्ध खाटू श्याम मंदिराशी संपर्क साधला. तिथले सीसीटीव्ही फुटेज धुंडाळले. या दोघांनी खाटू श्याम मंदिरात लग्न उरकल्याची चर्चा होती. या फुटेजमध्ये पोलिसांच्या हाती विशेष काही लागलं नाही. या दोघांनी राजस्थानमध्ये विवाह केला की महाराष्ट्रात हा विवाह केला आहे, यादृष्टीने तपास केल्या जात आहे. तर या दोघांनी खरंच लग्न केलं होतं का? याचाही तपास करण्यात येत आहे. प्रकरणातील गुंतागुंत वाढत असल्याने केतन अग्रवाल याच्या कुटुंबियांनी राष्ट्रपतींसह पंतप्रधानांना भाविनक पत्र लिहून लवकरात लवकर या प्रकरणाचा उलगडा करण्याची आणि दोषींना शिक्षा देण्याची विनंती केली आहे.

आज न्यायालयात हजर करणार

गेल्या सुनावणीत सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांची पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली होती. दोघांची न्यायालयीन कोठडी आज संपणार आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येईल. पोलिसांनी या 14 दिवसांत विविध कोनातून तपास केला आहे. पोलिसांच्या हाती या तपासात काही महत्त्वाचे धागेदोर लागलेले आहेत का हे आजच्या सुनावणीतून समोर येईल.

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना पत्र

केतन अग्रवाल खून प्रकरणाने त्याचे कुटुंबिय हादरले आहेत. मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याची खोली, कपडे, फोटो आणि त्याची घरातील अनुपस्थितिने कुटुंबियांना गलबलून येत आहे. आरोपींना कठोर शिक्षा द्यावी आणि न्याय द्यावा यासाठी त्याच्या कुटुंबियांनी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भावनिक पत्र लिहिले आहे. केतनच्या जाण्याच्या धक्क्याने त्याच्या आजोबांनीही जगाचा निरोप घेतला, अग्रवाल कुटुंबियांवर दुहेरी आघात झाला आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप