AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rinku Rajguru : ‘सैराट’मुळे रातोरात प्रसिद्धी, पण रिंकू राजगुरूला घरी VIP ट्रीटमेंट मिळत नाही; अभिनेत्री म्हणाली…

Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू आघाडीची अभिनेत्री आहे. असं असलं तरी तिला घरी कोणतीही व्हीआयपी ट्रीटमेन्ट मिळत नसल्याचं अभिनेत्रीनं सांगितलंय.

| Updated on: Nov 27, 2026 | 9:51 PM
Share
मराठी मनोरंजनविश्वात 'सैराट' चित्रपटातून रातोरात प्रसिद्धी मिळवणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. या चित्रपटातील अर्चीच्या भूमिकेमुळे रिंकू महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. पहिल्याच चित्रपटातून तिने प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली. त्यानंतर 'कागर', 'मेकअप', 'झुंड' यांसारख्या चित्रपटांमधून तिने आपल्या अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली. कमी वयात मोठं यश आणि लोकप्रियता मिळवणाऱ्या रिंकूचा चाहतावर्गही मोठा आहे. मात्र, एवढी लोकप्रिय अभिनेत्री असूनही तिला स्वतःच्या घरात कोणतीही व्हीआयपी वागणूक मिळत नाही.

1 / 5
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत रिंकूनं सांगितलं की, ती आज एक आघाडीची अभिनेत्री असली तरी तिच्या घरचे वातावरण आजही आधीसारखंच आहे, ते अजिबात बदललेलं नाही. अभिनेत्री म्हणाली, 'माझ्या घरी मला कोणी डोक्यावर बसवून ठेवत नाही, किंवा कुठलीही प्रिन्सेस ट्रीटमेंट वगैरे मिळत नाही. उलट घरी असल्यावर मला झाडून-पुसून काढावं लागतं.'

2 / 5
रिंकूनं सांगितलं होतं की, तिचे आई-वडील तिच्या यशामुळे आनंदी असले तरी तिला कायम जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करतात. तिच्या कामाचा त्यांना अभिमान आहे, मात्र, मिळालेलं यश ही केवळ सुरुवात असल्याची जाणीव ते तिला करून देतात.

3 / 5
रिंकूनं सांगितलं की, घरात चित्रपट, पुस्तकं, समाजातील घडामोडी आणि विविध विषयांवर चर्चा होते. आई-वडील शिक्षक असल्यामुळे घरात वाचन आणि अभ्यासाला विशेष महत्त्व दिलं जातं. याच वातावरणामुळे तिच्या विचारांवरही चांगले संस्कार झाले.

4 / 5
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं आणि रिंकू राजगुरूला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली. मात्र, एवढं यश मिळूनही तिनं आपला साधेपणा जपला आहे.

5 / 5
Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?