Silent City Of India: ना हॉर्नचा आवाज, ना ट्रॅफिक.. सर्वात शांत शहर! भारतातील सायलेंट सिटीत तुम्ही फिरायला गेलाय का?
जर तुम्ही भेट देण्यासाठी एखादे शांत ठिकाण शोधत असाल, तर आयझॉल हे एक उत्तम ठिकाण आहे. हे शहर म्हणजे आयझॉल. ही मिझोरामची राजधानी आहे. मोठ्या शहरांप्रमाणे येथे ना प्रचंड वाहतूक कोंडी असते, ना एकमेकांना मागे टाकण्याची लोकांची घाई असते. रस्त्यावरील आवाजही अगदी कमी असतो. हे शहर इतके शांत आहे की कोणीही आपल्या थकलेल्या मनाला येथे आराम देऊ शकतो.

Silent City Of India
- रोजच्या धावपळीच्या, गोंधळ, गडबडीच्या आयुष्यातून वेळ काढून शांत निवांत ठिकाणी फिरायला जावं असं प्रत्येकाला वाटते. मात्र हल्ली पर्यटनस्थळांवरही गर्दी अन् ट्रॅफिकमुळे शांतता मिळत नाही.
- पण भारतामध्ये असं एक शहर आहे जिथे ट्रॅफिक, वाहनांचा कसलाच आवाज येत नाही. म्हणूनच त्याला सायलेंट सिटी म्हणूनही ओळखले जाते.
- हे शहर म्हणजे आयझॉल. ही मिझोरामची राजधानी आहे. मोठ्या शहरांप्रमाणे येथे ना प्रचंड वाहतूक कोंडी असते, ना एकमेकांना मागे टाकण्याची लोकांची घाई असते.
- आयझॉल हे भारतातील एकमेव शांत शहर आहे. हे शहर वाहतुकीच्या शिष्टाचारासाठी ओळखले जाते. येथील वाहतूक व्यवस्था भेट देणाऱ्या प्रत्येकाला प्रभावित करते. गर्दी असताना आणि तासन्तास वाहतूक कोंडीत अडकलेले असतानाही, लोक शिष्टाचाराचे पालन करतात.
- आयझॉल हे एक सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर आहे. येथे कुठेही उभे राहून तुम्ही आजूबाजूच्या सौंदर्याकडे तासन्तास पाहू शकता. हे शहर उंच टेकड्या आणि दऱ्यांनी वेढलेले आहे.
- येथील लोक रस्त्यावर आपली वाहने एकाच लेनमधून चालवतात. ते एकमेकांना ओव्हरटेक करत नाहीत. कोणीही हॉर्न वाजवत नाही. गर्दीच्या वेळीसुद्धा, प्रत्येकजण एकमेकांशी नम्रपणे वागतो.
Follow Us






