चंद्रकांत पाटलांच्या पक्ष सोडण्याच्या हालचाली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जागा न मिळाल्याने मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. ते शिंदेंची शिवसेना सोडून भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी या नाराजीची दखल घेत प्रतिक्रिया दिली आहे.

गणेश सोळंकी, बुलढाणा, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगावमध्ये पक्षाला मोठा हादरा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेच्या महायुतीमध्ये एकही जागा न मिळाल्याने मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हे नाराज असल्याची चर्चा आहे. या नाराजीवरुन ते पक्षाला थेट सोडचिठ्ठी देणार असल्याचेही सांगितले जात आहे. शिवसेना सोडून ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मंत्री गुलाबराव पाटलांनी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रयत्न केले आहेत, पण त्याचाही काही उपयोग झाला नसल्याचे समोर आले आहे. याप्रकरणावर आता उपमुख्यमंत्री आणि शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
चंद्रकांत पाटील यांच्या नाराजीची दखल आता शिंदेंनी घेतली आहे. ते म्हणाले की. चंद्रकांत पाटील हेही आमचा परिवार आहे. काही नाराजी असेल तर त्यांच्याशी चर्चा केली जाईल. मी त्यांच्याशी बोलतो. परिवार आहे. कुटुंब आहे आमचं, त्यांची काय अडचण असेल, ती सोडविली जाईल, असे मोठे वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
यावेळीचा दुष्काळ मोठे, आहे , संकट मोठे आहे
शेतकऱ्याच्या मागे सरकार मोठ्या ताकदीने उभे आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर आम्ही गेलो शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे दुष्काळ जाहीर केला. सगळे मंत्रिमंडळ बांधावर गेले. शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम मदत देखील जमा झाली . शेतकऱ्यांच्या मागे ताकदीने उभे राहण्याची आवश्यकता आहे. पाणी, जनावरांना चारा देण्याचे काम सरकार करेल. शिवसेना देखील शेतकऱ्यांच्या मागे उभी आहे. दुष्काळ असताना हजारो लाडकी बहिण भाऊ आले त्यांना नतमस्तक होतो, असंही यावेळी शिंदे म्हणाले.
कर्जतमधील वृक्षतोड प्रकरणावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया दिली आहे. असे कोणतीही कार्यवाही निर्णय झालेला नाही. पर्यावरण पुरक प्रकल्प आमही करू. पर्यावरण जतन करणे हे सरकारचं काम आहे. सगळीकडे आरोग्य सुविधा वाढत आहे . शेतकऱ्यांचे लाडक्या बहिणीवर आरोग्य सुदृढ असले पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. या वेळचा दुष्काळ मोठा आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. शेतकऱ्यांचे आम्ही ऐकूण घेतले. तीन महिन्याचा शिधा देण्याचे ठरले आहे, असं ही यावेळी शिंदेंनी स्पष्ट केलं.
