रोजच्या धावपळीत विसावा हवाय? या गावांना भेटी द्या, मनाला रिफ्रेश कराल
रोजच्या धावपळीत अनेकांना विसावा हवा असतो. त्यामुळे क्षणभर विश्रांतीसाठी भारतातील या गावांना आवर्जून भेट द्या. गावाला भेट दिली, तर मन फ्रेश होईल.

Image Credit source: टीव्ही9 मराठी
- रोजच्या धावपळीचा कंटाळा आला तर अनेक गावाची वाट धरतात. काही जण शहरात कामात व्यग्र असतात की, त्यांना अधिक वेळ सुट्टी देखील मिळत नाही. त्यामुळे काही जण दोन-तीन दिवसांच्या सुट्टीत मनाला रिफ्रेश होणारं ठिकाण शोधत असतात.
- धावपळीची जीवशैली सोडून काही जण शांततेचा अनुभव घेण्यासाठी निसर्गरम्य वातावरणात जात असतात. भारतात अनेक गाव अशा वातावरणाचा अनुभव घेता येईल.
- मेघालयमधील मावलिनॉन्ग गाव खूप सुंदर आणि स्वच्छ आहे. या गावाची नोंद आशियातील सर्वात स्वच्छ गावात होते. गावात ठिकठिकाणी झाडे पाहायला मिळतात. गावातील शुद्ध वातावरणात पर्यटक रमून जातो.
- नागालँडमधील खोनोमा गावातील हिरवळ आणि शेती पाहायला मिळते. खोनोमो हे भारतातील पहिलं हिरवं गाव आहे. या गावात संस्कृती, पारंपरिक घरे पाहायला मिळतात. डोंगराळ भागात राहणाऱ्यांची अनोखी खाद्यसंस्कृती पाहायला मिळते.
- अरुणाचल प्रदेशातील जीरो व्हॅली हे ठिकाण स्थानिक पर्यंटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. या भागातील लोकांची घरे पारंपरिक आहेत. फोटोग्राफी करणाऱ्यांची आवड असणाऱ्या मोठ्या संख्येने या गावाला भेट देतात.
Follow Us





