AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिचं कन्यादान मी करेन..; दिवंगत सतीश कौशिक यांच्या लेकीसाठी अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट

दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांची मुलगी वंशिका हिच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

तिचं कन्यादान मी करेन..; दिवंगत सतीश कौशिक यांच्या लेकीसाठी अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट
सतिश कौशिक, अनुपम खेरImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 16, 2026 | 8:27 AM
Share

मैत्री म्हणजे केवळ एकत्र असणं नव्हे, तर कठीण काळात कुटुंबासारखं खंबीरपणे साथ देणंही असतं. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध केली आहे. त्यांचे जिवलग मित्र आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर ते त्यांची मुलगी वंशिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. 15 रोजी वंशिकाने तिचा 14 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट नेटकऱ्यांच्या मनाला भिडली आहेय. अनुपम यांनी वंशिकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती त्यांच्यासोबत मनमोकळेपणे गप्पा मारताना दिसत आहे.

वंशिकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अनुपम खेर यांनी लिहिलं, ‘देव तुला या जगातील सर्व सुख, दीर्घ आणि सुंदर आयुष्य, तुझी सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची शक्ती देवो. तू माझी मुलगी आहेस. सतीश आपल्यासोबत असतानाही मी तुला माझ्या मुलीप्रमाणे आणि मैत्रिणीप्रमाणे वागवलं आहे. काही नाती रक्ताच्या नात्यातून नव्हे, तर प्रेम, विश्वास आणि आपलेपणातून बनतात. आपलं नातं अगदी तसंच आहे. मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. मी तुझं रक्षण करेन, तुला प्रोत्साहिन देईन आणि प्रत्येक आव्हानाला मी तुला साथ देईन. कुणास ठाऊक, पण अनेक वर्षांनंतर जेव्हा तू लग्न करण्याचा निर्णय घेशील, तेव्हा तुझं कन्यादान करण्याचं भाग्यही मला लाभेल. तो दिवस अजून दूर आहे, पण फक्त त्या विचारानेच माझं हृदय प्रेमाने भरून येतंय.’

अनुपम खेर यांची पोस्ट-

View this post on Instagram

A post shared by Anupam Kher (@anupampkher)

या पोस्टच्या अखेरीस अनुपम खेर यांनी सतीश कौशिक यांच्या आठवणीत लिहिलं, ‘मला खात्री आहे की तो आज स्वर्गातून हसत असेल आणि त्याच्या मुलीला खूप प्रेम, आशीर्वाद पाठवत असेल.’ सतीश कौशिक यांच्या निधनानंतर अनुपम खेर वंशिकासाठी फक्त मित्रच नाही, तर त्यांच्या कुटुंबाचाच एक भाग बनले. ते अनेकदा वंशिकाच्या शाळेतल्या कार्यक्रमांनाही हजेरी लावताना दिसतात. स्वत: वंशिकानेही अनेकदा सांगितलं आहे की, वडिलांच्या निधनानंतर अनुपम खेर यांनी तिला कधीही एकटेपणा जाणवू दिला नाही.

मार्च 2023 मध्ये सतीश कौशिक यांचं निधन झालं होतं. होळीच्या पार्टीनिमित्त ते एका मित्राला भेटायला गेले होते, तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. सतीश कौशिक यांनी शशी कौशिक यांच्याशी लग्न केलं होतं आणि या दोघांना एक मुलगा होता. मात्र वयाच्या दुसऱ्याच वर्षी त्यांच्या मुलाचं निधन झालं. त्यानंतर 2011 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून हे दोघं पुन्हा पालक झाले. कौशिक यांची मुलगी वंशिका आता 14 वर्षांची आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार