AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gautam Gambhir : हार्दिक पंड्या का सिलेक्ट झाला नाही? टीममध्ये कधी घेणार? गौतम गंभीरने मोजक्या शब्दात विषय संपवला

Gautam Gambhir : हार्दिक पंड्या टीममध्ये कधी पुनरागमन करणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. टीम इंडियाचे हेड कोच गौतम गंभीर यांनी या प्रश्नावर उत्तर दिलं. सध्या हार्दिक फिटनेसमुळे टीमच्या बाहेर आहे.

Gautam Gambhir : हार्दिक पंड्या का सिलेक्ट झाला नाही? टीममध्ये कधी घेणार? गौतम गंभीरने मोजक्या शब्दात विषय संपवला
Hardik Pandya-Gautam Gambhir
| Updated on: Sep 18, 2026 | 2:31 PM
Share

हार्दिक पंड्या टीम इंडियात पुनरागमन कधी करणार? या बद्दल चित्र अजून स्पष्ट नाहीय. हार्दिक पंड्याच्या फिटनेसबद्दल टीम इंडियाला कुठलाही धोका पत्करायचा नाहीय. वनडे क्रिकेटमध्ये 10 षटकांचा कोटा पूर्ण करण्याइतपत हार्दिकचा फिटनेस नाहीय, हे हेड कोच गौतम गंभीर यांनी स्पष्ट केलं. हार्दिकला घाईगडबडीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला लावणार नाही हे गंभीर यांनी स्पष्ट केलं. हार्दिक जेव्हा पूर्णपणे गोलंदाजी करण्यासाठी फिट होईल तेव्हा, टीम इंडियाकडे युवा ऑलराऊंडर नितीश कुमार रेड्डीसह त्याला खेळवण्याचा पर्याय उपलब्ध असेल असे संकेत गंभीर यांनी दिले. अफगाणिस्तान विरुद्ध तिसऱ्या टी20 सामन्यात भारताने 127 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हार्दिक पंड्या सध्या 10 ओव्हर टाकण्याच्या स्थितीत नाहीय असं गंभीर यांनी सांगितलं.

आम्हाला त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घाईगडबडीत आणायचं नाहीय. जेव्हा तो फिट होईल, तेव्हा हार्दिक आणि नितीश दोघे खेळण्याची शक्यता आहे. हार्दिक दीर्घकाळापासून वनडे आणि टी20 क्रिकेटचा भाग आहे. फिटनेस आणि वर्कलोड लक्षात घेऊन सतत हार्दिकला आलटून-पालटून संधी दिली जाते. टीमची नजर आता त्याच्या गोलंदाजी करण्याच्या क्षमतेवर आहे. अफगाणिस्तान विरुद्ध 3-0 ने सीरीज जिंकल्यानंतर गंभीर हे बोलत होता.

फक्त बॅटिंगमुळे हार्दिकला जागा नाही मिळणार

फक्त फलंदाजीच्या बळावर हार्दिकला टीममध्ये जागा मिळणार नाही हे गंभीरच्या वक्तव्यावरुन स्पष्ट झालं. गोलंदाजीचा सुद्धा पर्याय मिळेल अशा पद्धतीने टीमला हार्दिकची गरज आहे. ऑस्ट्रेलिया A विरुद्ध पुडुचेरी येथे वनडे सीरीज होणार आहे. त्या इंडिया A संघात हार्दिकचा समावेश केला आहे. BCCI च्या सेंटर ऑफ एक्सीलेंसकडून मिळणाऱ्या फिटनेसवर त्यांचं खेळणं अवलंबून आहे. टीम मॅनेजमेंटला हार्दिक बद्दल कुठलाही निर्णय घाईगडबडीत घ्यायचा नाहीय. त्याचं इंटरनॅशनल कमबॅक त्याचा पूर्ण फिटनेस आणि खासकरुन 10 ओव्हर गोलंदाजी करण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे.

Follow Us
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?