AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shivsena | 2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी खास रणनीती काय?

Shivsena | 2029 साठी Gen Z मतदारांवर शिंदे सेनेचा मोेठा फोकस; 38 कोटी तरुणांसाठी खास रणनीती काय?

| Updated on: Aug 03, 2026 | 11:33 AM
Share

दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर राज्यातील राजकीय पक्षांनी जनरेशन-Z (Gen Z) मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आगामी निवडणुकांच्या तयारीला लागली असून, तरुण मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष रणनीती आखण्यास सुरुवात केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, 2029 पर्यंत देशात सुमारे 38 कोटी Gen Z मतदार असतील. हे लक्षात घेऊन शिवसेनेकडून लवकरच पक्षाची विशेष बैठक बोलावली जाणार असून, या नव्या मतदारवर्गाचे नेतृत्व करू शकणाऱ्या युवा चेहऱ्यांची निवड करण्यावर भर दिला जाणार आहे. पक्षातील युवा नेत्यांसह विविध सामाजिक संघटनांमध्ये सक्रिय असलेल्या तरुणांना संधी देण्याचा विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

यासोबतच शहर आणि ग्रामीण भागातील Gen Z मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी राज्यभर युवक मेळावे आयोजित करण्याची तयारीही पक्षात सुरू आहे. तरुणांच्या प्रश्नांवर आतापासूनच सक्रियपणे काम करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

अलीकडेच जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनात मोठ्या प्रमाणावर Gen Z तरुणांचा सहभाग होता. या आंदोलनानंतर केंद्रातील तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या घटनाक्रमामुळे तरुण मतदारांची राजकीय ताकद अधोरेखित झाली असून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी या मतदारवर्गाकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, 2029 मध्ये देशात लोकसभा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये Gen Z मतदारांची भूमिका निर्णायक ठरू शकते, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेसह महायुतीतील पक्षांनी तरुण मतदारांशी संवाद वाढवण्यावर आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यावर भर देण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे.

Published on: Aug 03, 2026 11:33 AM

Follow Us